डॉक्टर कपल बालीला हनीमूनसाठी गेलं, अन् परतलेच नाही; आयुष्याची साथ ठरली फक्त 8 दिवसांची

Doctor Couple Died On Honeymoon: हातावरची मेहंदी अजून गेली नव्हती, नवीन संसाराला सुरुवात झाली नव्हती, हनीमूनच्या वेळी डॉक्टर कपलला एक चूक जीवावर बेतली. 

Updated: Jun 12, 2023, 01:09 PM IST
डॉक्टर कपल बालीला हनीमूनसाठी गेलं, अन् परतलेच नाही; आयुष्याची साथ ठरली फक्त 8 दिवसांची title=
honeymoon chennai doctor couple die in bali boat ride photoshoot Trending News in Google Today

Doctor Couple Died in Bali on Honeymoon: लग्न झालं, हातावर मेहंदीचा रंग सुंदर चढला होता. नवीन संसाराची स्वप्न रंगली...भारतातील या डॉक्टर कपलने हनीमूनसाठी बालीची निवड केली खरी पण संसाराला सुरुवात करण्याऐवजी आयुष्यालाच पूर्णविराम लागला. या कपलला त्यांची एक चूक जीवावर बेतली. नवीन लग्न झालेल्या कपलची हनीमूनसाठी पहिली पसंदी ही बाली आहे. निळ्याभोर आकाश आणि खाली स्वच्छ सुंदर असं निळं समुद्र यात छोटे छोटे घरं...

अन् त्यांची ती चूक...

सोशल मीडियामुळे इन्स्टाग्राम, फेसबुकवर फोटो आणि व्हिडीओ टाकण्यासाठी कपल मोठ्या प्रमाणात फोटोशूट करतात. डॉक्टर असून अती उत्साह या दोघांना नडला. स्पीड बोटमधून समुद्र आणि निसर्गाचा आनंद घेत असताना हे कपल समुद्रात उतलं. तेही फोटो काढण्यासाठी...पण हे फोटो स्टेट्सवर अपडेट न होता त्यांचा घरातील भिंतीवर टांगण्याची वेळ आली. फोटोसाठी जीवाची पर्वा न करता या दोघांनी जो मुर्खपणा केला त्यानंतर त्यांचा कुटुंबियांना धक्का बसला आहे. (honeymoon chennai doctor couple die in bali boat ride photoshoot Trending News in Google Today )

1 जूनला लोकेश्वरन आणि विबुश्निया यांचा विवाह पूनमल्लीमध्ये थाटामाट्यात झाले होते. बालीत समुद्रात बुडून या दोघांच्या मृत्यूनंतर दोन्ही घरात आनंदाची जागा आक्रोशाने घेतली. 

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार वॉटर बाईक चालवताना फोटोशूट करताना त्या दोघांचा तोल गेल्याने ते समुद्रात बुडाले. तर काही स्थानिकांचं म्हणं आहे की, ते दोघे फोटोशूट करण्यासाठी पाण्यात उतरले होते. चेन्नईमधील या दाम्पत्यांच्या कुटुंबानी बाली गाठल्यावर त्यांचा मृतदेह पोस्टमार्टन करुन कुटुंबाला देण्यात आलं. दरम्यान केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारने त्यांचं मृतदेह चेन्नईला आणण्यासाठी मदत करावी अशी मागणी दोन्ही कुटुंबियांनी केली.