नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जवानांकडून देशासंबंधित अनेक सीक्रेट बाहेर काढण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या माध्यमातून हनी ट्रॅप मॉडेलचा वापर करतेय. पाकिस्तानच्या या हनी ट्रॅपच्या जाळ्यात अनेक भारतीय जवान अडकल्याच्या अनेक घटना देखील समोर आल्या होत्या. मात्र आता पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्या नापाक हरकती सुरु केल्या आहेत. यावेळी त्यांनी भारतीय जवानांसाठी मोठा हनी ट्रॅप मॉडेल आखलाय. या मॉडेलमधून भारतीय़ जवानांकडून अनेक सीक्रेट उकळण्याचा प्रयत्न होणार आहे. दरम्यान या महिला एजंट भारतीय जवानांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात कसे ओढतात, ते जाणून घेऊयात.
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या माध्यमातून भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी हनी ट्रॅप मॉडेल आखतेय. या मॉडेलमध्ये 50 सुंदर महिला एजंटचा समावेश करण्यात आला आहे. या महिला एजंटच्या निषाण्यावर भारतीय जवान असणार आहेत. दरम्यान महिलांना लष्करात ज्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते, त्याप्रमाणे ट्रेनिंग देण्यात आले आहे. आता या महिला ट्रेन झाल्या असून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या आदेशाची वाट पाहतायत.
भारतीय जवानांना हनीट्रॅप कसे केले जाते?
पाकिस्तानी महिला एजंटसना भारतीय लष्कारातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची माहिती शेअर केली जाते व त्या अधिकाऱ्याला हनी ट्रॅप जाळ्यात ओढण्याचे टार्गेट दिले जाते. या आधी या महिला एजंटसचे सोशल मीडियावर फेक अकाऊंट आयडी क्रिएट करण्यात येतात. या आयडीसाठी त्यांना स्पेशल भारतीय नावही दिले जातात.
सोशल मीडियावर अकाऊंट क्रिएट झाल्यानंतर या महिला एजंट्स टार्गेटवर असलेल्या अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. या रिक्वेस्ट अधिकाऱ्यांनी स्विकारल्यानंतर दोघांमध्ये चॅट सुरु होतात. या घटनेत महिलांना हॉटेल रूमसह मेकअप किट देण्यात आले आहेत. जेणेकरून या महिलांना सुंदर दिसून अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढता येईल.
चॅटींग सुरु झाल्यानंतर अधिकारी आणि महिलेमध्ये हॉटेलवर भेटण्यासह अनेक गोष्टी होतात. यामध्ये या महिला एजंट अधिकाऱ्यांचे आक्षेपार्ह फोटो अथवा व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करू लागतात. या ब्लॅकमेलिंगमध्ये अधिकाऱ्याला स्वत:चा बचाव करण्यासाठी देशाच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त कागदपत्रे देण्यास सांगितले जाते. ही ब्लॅकमेलिंग सतत सुरु राहते आणि अधिकारी या ट्रॅपमध्ये फसला जातो.
भारतीय जवानांना आवाहन
भारतीय गुप्तचर संस्थाना पाकिस्तानच्या या नापाक हरकतीची माहीती मिळाली आहे. त्यामुळे भारतीय गुप्तचर संस्थांनी लष्कर आणि बीएसएफच्या जवानांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, असे भारतीय गुप्तचर संस्थांना म्हटले आहे.