Home Loan | घर खरेदीची सुवर्णसंधी; बँकांचे गृहकर्जावर आतापर्यंतचे सर्वात कमी व्याजदर

भारतात होम लोनच्या व्याजदरांनी रेकॉर्ड निच्चांकी दर गाठला आहे. घटत्या व्याजदराच्या या काळात होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होत आहे. 

Updated: Aug 26, 2021, 10:28 AM IST
Home Loan | घर खरेदीची सुवर्णसंधी; बँकांचे गृहकर्जावर आतापर्यंतचे सर्वात कमी व्याजदर title=

नवी दिल्ली : भारतात होम लोनच्या व्याजदरांनी रेकॉर्ड निच्चांकी दर गाठला आहे. घटत्या व्याजदराच्या या काळात होम लोन घेणाऱ्या ग्राहकांना फायदा होत आहे. नुकतेच एका सर्वेमध्ये समोर आले आहे की, महाग व्याजदर असलेले होमलोन स्वस्त व्याजदर असलेल्या होमलोन मध्ये ट्रान्सफर करण्याच्या केसेसमध्ये 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

RBIच्या निर्णयाचा फायदा
 लोन अगेंस्ट प्रॉपर्टीची मागणी दरवर्षी 20 टक्के वाढत आहे. भारतात होमलोनच्या वाढत्या मागणीला रिझर्व बँकेचा रेपोरेट दर 4 टक्के ठेवण्याचा निर्णय कारणीभूत आहेत. यामुळे बहुतांश बँका आपला व्याजदर 7 टक्क्यांपर्यंत कायम ठेवण्यात यशस्वी आहेत.
 
 होम लोनची मागणी वाढली
 
 भारतात होमलोन घेऊन इनकम टॅक्सची रक्कम वाचवण्यासोबतच दीर्घ अवधीसाठी आपल्याकडे एक संपत्ती जोडण्याचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. ज्यामुळे देशात गेल्या काही वर्षात होम लोन घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 
 
एका खासगी प्रॉपर्टी क्षेत्रातील कंपनीने केलेल्या अभ्यास अहवालातून अशी माहिती समोर आली आहे की, वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीमध्ये देशातील महानगरांमध्ये होम लोन अमाउंटची सरासरी रक्कम 26 लाख रुपये होती. 

कोणती बँक किती व्याजदर देते

जर तुम्ही 30 लाख रुपये होम लोन 20 वर्षांसाठी घेऊ इच्छिता तर त्यावरील व्याजदर याप्रकारे आहेत.

बँक    व्याज दर  मासिक हफ्ता    प्रोसेसिंग फी
कोटक महिंद्रा बॅक 6.65-7.20% 22633-23620 रुपये   2%
स्टेट बॅक ऑफ इंडिया 6.75-8.50% 22811-26835 रुपये 31 aug पर्यंत शुन्य
बॅक ऑफ बड़ौदा 6.75-8.60% 22811-26225 रुपये 0.5-2%
ICICI बॅक 6.75-7.55% 22811-24260 रुपये  0.5-2%
HDFC  6.75-7.65% 22811-24244 रुपये  1.5%
यूनियन बैंक ऑफ इंडिया 6.80-7.40% 22,900-23985 रुपये  0.5%
इंडियन बैंक 6.80-7.90% 22,900-24,907 रुपये 0.5%
पंजाब नेशनल बैंक 6.80-9.00% 22,900-26,992 रुपये

30 Sept पर्यंत शुन्य

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया 6.85-7.30% 22,900-23,802 रुपये 0.5%