जैशनंतर हिज्बुल मुजाहिदीनही आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत

हिज्बुल मुजाहिदीन आत्मघाती हल्ल्याच्या पवित्र्यात 

Updated: Feb 21, 2019, 12:29 PM IST
जैशनंतर हिज्बुल मुजाहिदीनही आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत title=

नवी दिल्ली : जैश ए मोहम्मदने केलेल्या आत्मघाती हल्ल्याप्रमाणे आता हिज्बुल मुजाहिदीन आत्मघाती हल्ल्याच्या पवित्र्यात असल्याची माहिती गुप्तहेर संघटनांकडून मिळालेली आहे. हिरव्या रंगाच्या स्कॉर्पिओला यासाठी तयार केलं जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. चौकीबाल आणि तंगधार या दरम्यान हा हल्ला होणार असल्याची माहिती आहे. हल्ल्यासाठी स्थानिक काश्मीरी तरूणांची साथ घेतली जात असल्याची गुप्तहेरांची माहिती आहे. त्याचप्रमाणे सीमेपलीकडून ५ ते ६ दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे. गुरेझ सेक्टरमध्ये या संभाव्य घुसखोरीच्या तयारीत आहेत. दरम्यान पुलवामा इथे झालेल्या हल्ल्यानंतर एनआयएच्या शोधपथकाला सापडलेला लोखंडी तुकडा महत्त्वाचा दुआ सिद्ध होऊ शकतो. या लोखंडी तुकड्यावरून या गाडीच्या चेसी नंबर शोधण्याचा आणि त्याद्वारे मालकाचा शोध घेण्याचा संरक्षण दलांचा प्रयत्न आहे.

पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवान शहीद झाले होते.