मोबाईल पेमेंट करा आणि मिळवा १ लीटर पेट्रोल

एचपी री-फ्यूएल अॅपद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला १ लीटर पेट्रोल फ्री मध्ये मिळेल. 

Updated: Dec 1, 2018, 04:26 PM IST
मोबाईल पेमेंट करा आणि मिळवा १ लीटर पेट्रोल  title=

 नवी दिल्ली  | वाढत्या इंधनदरांमुळे त्रस्त जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. हिंदूस्तान पेट्रोलियमने एक भन्नाट ऑफर ग्राहकांसाठी आणली आहे. तुम्ही मोबाईल पेमेंट केल्यानंतरच एक लीटर पेट्रोल फ्री मिळेल.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी हे करावं लागेल

एक लीटर पेट्रोल फ्री मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही. तुम्हाला फक्त इतकंच करायचंय की, जेव्हा तुमच्या घरी एचपीचा सिलिंडर पोहचता केला जातो, त्यावेळेस त्याचं पेमेंट एचपी री-फ्यूल या अॅपद्वारे करायचं आहे.

फुकटात मिळणार १ लीटर पेट्रोल

एचपी री-फ्यूएल अॅपद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला १ लीटर पेट्रोल फ्री मध्ये मिळेल. ऑफरच्या दरम्यान तुम्ही जास्तीत जास्त ८५ रुपयांपर्यंत पेट्रोल घेऊ शकता. याशिवाय तुम्ही ५ लीटर पेट्रोल घेऊ शकता. याचं पेमेंट एचपी री-फ्यूएलच्या माध्यमातून केल्यानंतरच तुम्हाला १ लीटर पेट्रोल फ्री मिळेल. यानुसार तुम्ही ऑफर वैध असेपर्यंत १०० रुपयांपर्यंत पेट्रोल घेऊ शकता. ही ऑफर केवल ३१ डिसेंबरपर्यंत आहे.

५ लीटरवर १ लीटर पेट्रोल फ्री

एचपीसीएच्या ग्राहकांसाठी दुसरी ऑफर आहे. एचपीसीएलकडून  ५ लीटर पेट्रोल खरेदी केल्यास तुम्हाला १ लीटर पेट्रोल फ्री मिळेल. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एचपी री-फ्यूल अॅपद्वारे पेमेंट करावं लागेल. पेमेंट केल्यानंतरच तुम्हाला १ लीटर पेट्रोल फ्री मिळेल.