Aconite Flower Use: एकदम डेंजर फूल ! सुगंध घेतल्यावर व्हाल बेधुद्ध, खाल्ल तर होईल मृत्यू

या पृथ्वीतलावर एक असे डेंजर फूल की ज्याचा सुगंध घेतल्यावर लोक बेधुद्ध होतात आणि जर चुकून हे  फूल खाल्ल तर मृत्यू ओढावतो. Aconite Flower असं या जेवघेण्या फुलाचे नाव आहे. मात्र, या फुलाचा वापर अनेक गंभीर आजारांवर औषध निर्मीतीसाठी केला जातो. 

Updated: Jan 11, 2023, 10:47 PM IST
Aconite Flower Use:  एकदम डेंजर फूल ! सुगंध घेतल्यावर व्हाल बेधुद्ध, खाल्ल तर होईल मृत्यू title=

Aconite Flower Use:  फुलांचे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळे स्थान आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी फूल अर्पण केले जाते. आनंदाचा क्षण असो की दुख:चा अशा वेळेस काहीच न बोलता आपल्या भावना व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे फूल. काही फूल दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक असतात. तर, काही फुलांचा सुगंध मोहित करणारा असतो. मात्र, या पृथ्वीतलावर एक असे डेंजर फूल की ज्याचा सुगंध घेतल्यावर लोक बेधुद्ध होतात आणि जर चुकून हे  फूल खाल्ल तर मृत्यू ओढावतो. Aconite Flower असं या जेवघेण्या फुलाचे नाव आहे. मात्र, या फुलाचा वापर अनेक गंभीर आजारांवर औषध निर्मीतीसाठी केला जातो. 

हे फूल इतके धोकादायक आहे की याच्या आजूबाजूला साधं गवतही उगवत नाही. Aconite Flower नावाने ओळखलं जाणार हे फूल अत्यंत दुर्मिळ आहे. हे फूल सहजासहजी सापडत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये सुमारे 10000 फूट उंचीवर हे फूल आढळते. 

हिमालय पर्वतावरील नामिक आणि हिरामणी या हिम नद्यांच्या जवळपास हे फूल आढळते.  जुलै आणि ऑगस्टमध्ये या झाडाला निळ्या रंगाची फुले येतात. या फुलाचा उपयोग औषध निर्मितीसाठी केला जातो. हे फूल म्हणजे एक वनस्पती आहे.  अँजिओस्पर्मिक प्रकारात ही वनस्पती मोडते. या वनस्पतीला मुळे, खोड, पाने, फळे, फूल, बिया असतात.

या फुलांपासून मधुमेह, पक्षाघात यांसारख्या आजारांवर औषधे तयार केली जातात. अगदी सावधानीपूर्वक या फुलांची छाटनी करुन प्रयोग शाळेत या फुलांपासून औषध निर्मिती केली जाते. मात्र, हे फूल झाडावर असताना कुणीही याच्या जवळ जाणे म्हणजे अत्यंत धोकोदायक आहे. या फुलाच्या झाडाजवळ  दुसरी कोणतीही वनस्पती उगवत नाही यावरून ते किती धोकादायक  याचा अंदाज येतो. या फुलाचा सुगंध घेतल्यास बेशुद्ध होतात. तर, एखाद्या प्राण्याने त्याची पाने खाल्ली तर तो लगेच त्या प्राण्याचा मृत्यू होतो असा दावा वैज्ञानिक करतात.