हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी; मनाली- लेह महामार्ग वाहतुकीवर परिणाम

या वाटेला जाताय तर नक्की वाचा....

Updated: Oct 7, 2019, 01:41 PM IST
हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टी; मनाली- लेह महामार्ग वाहतुकीवर परिणाम  title=
छाया सौजन्य- एएनआय

मुंबई : रविवारपासूनच वातावरणात आलेल्या काही बदलांचे थेट परिणाम हे मनाली- लेह महामार्गावर पाहायला मिळाले. कारण हिमाचल प्रदेश येथील बहुतांश भागांमध्ये बर्फवृष्टी झाल्याचं कळत आहे. रानी नल्लाह आणि रोहतांग पास यादरम्यानच्या वाहतुकीवर परिणाम झाले आहेत. 

सोमवारी झालेल्या अतिबर्फवृष्टीमुळे रस्ते वाहतुकीवर याचे थेट परिणाम दिसत आहेत. ज्याअंतर्गत किलाँग आणि मनाली मार्गावरील बस सेवा बंद करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशात समुद्रसपाटीपासून अधिक उंचीवर असणाऱ्या लाहौल- स्पिती या भागातही बर्फवृष्टी झाली. तर, कुल्लूतही बर्फवृष्टी पाहायला मिळाली. 

रविवारी सिरमौर जिल्ह्यात कोसळलेल्या एकाद दरडीमुळेही वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७०७ या कारणामुळे काही कारणासाठी बंद असल्याचं पाहायला मिळालं होतं. बर्फवृष्टीशिवाय येथील बऱ्याच भागांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाऊसही सुरु आहे. त्यामुळे हवामानातील या बदलांचा स्थानिकांच्या जीवनशैलीवर परिणाम दिसत आहे. तर, पर्यटकांसाठी हा काळ परवणीचा ठरत आहे.  

हवामान खात्याकडून येत्या काही दिवसांमध्ये देशातील बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय जम्मू आणि काश्मीर परिसराट गडगडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि विदर्भातही पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.