Cloudburst : निसर्ग कोपतो तेव्हा काय घडतं? पाहा Top 3 व्हिडीओ

काही दिवसांपूर्वीच किन्नौर (Kinnaur) येथे दरड कोसळण्याच्या भयावह घटनेनंतर आता हिमाचल प्रदेशातील (Lahaul Spiti ) लाहौल स्पिती (Spiti Valley) या भागावर निसर्ग नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

Updated: Jul 28, 2021, 06:33 PM IST
Cloudburst : निसर्ग कोपतो तेव्हा काय घडतं? पाहा Top 3 व्हिडीओ  title=

किन्नौर : काही दिवसांपूर्वीच किन्नौर (Kinnaur) येथे दरड कोसळण्याच्या भयावह घटनेनंतर आता हिमाचल प्रदेशातील (Lahaul Spiti ) लाहौल स्पिती (Spiti Valley) या भागावर निसर्ग नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

हिमवाळवंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील या भागामध्ये निसर्गाचं रौद्र रुप पाहायला मिळत असून, या ठिकाणची दृश्य धडकी भरवत आहेत. मंगळवारी लाहौल स्पिती भागात झालेल्या ढगफुटीमुळं एकच हाहाकार माजला. ढगफुटीमुळं झालेल्या बेफाम पावसानंतर या भागात नद्यांच्या पात्रांमध्ये पाण्याची पातळी वाढली आणि बघता बघता वाहणाऱ्या पाण्यानं आजुबाजूचा परिसर आणि वाटेत येणारी प्रत्येक गोष्ट गिळंकृत करण्यास सुरुवात केली. या संकटामध्ये जवळपास 9 जणांचा मृत्यू झाला असून काहीजण बेपत्ताही असल्याचं म्हटलं जात आहे. 

Kolhapur lndslide Video : कोल्हापुरात दुसरं माळीण होताहोता वाचलं 

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभाग सचिव सुदेश मोख्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार इथं बचावकार्य सुरु असून नागरिकांसाठी शोधमोहिमही हाती घेण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या भागात काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांते तंबूही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत, सोबतच काही भागात मोठी यंत्रही वाहून गेल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. ही दृश्य पाहता प्रत्यक्षदर्शींची त्या क्षणी काय अवस्था झाली असणार याचा अंदाज सहजपणे लावता येत आहे. 

या ठिकाणची दृश्य धडकी भरवत आहेत

आयटीबीपीच्या सहाय्यानं या भागासह हिमाचल प्रदेशातील इतरही ठिकाणांवर बचावकार्य हाती घेण्यात आली आहेत. सोबतच नागरिकांना हवामानातील बदलांच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.