मुख्यमंत्री असावा तर असा! बर्फवृष्टीत अडकलेल्या रुग्णासाठी दिलं आपलं हेलिकॉप्टर, स्वत: रस्त्याने केला प्रवास

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (Himachal Pradesh chief minister sukhwinder singh sukhu) यांनी बर्फवृष्टीत (Snowfall) अडकलेल्या रुग्णासाठी आपलं हेलिकॉप्टर (Helicopter) देऊन टाकलं. मुख्यमंत्री चंबा जिल्ह्यात (Chamba District) चालले होते. यावेळी बर्फवृष्टीमुळे रस्ता बंद असून एक रुग्णवाहिका (Ambulance) अडकली असल्याचं त्यांनी पाहिलं. यानंतर त्यांनी रुग्णाला नेण्यासाठी आपलं हेलिकॉप्टर दिलं.  

Updated: Feb 15, 2023, 09:36 AM IST
मुख्यमंत्री असावा तर असा! बर्फवृष्टीत अडकलेल्या रुग्णासाठी दिलं आपलं हेलिकॉप्टर, स्वत: रस्त्याने केला प्रवास title=

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (Himachal Pradesh chief minister sukhwinder singh sukhu) आज चंबा जिल्ह्याच्या दौऱ्यावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी चंबा जिल्ह्यापासून ते शिमलापर्यंत (Shimla) हेलिकॉप्टरने (Helicopter) प्रवास करायचा होता. पण बर्फवृष्टीमुळे (Snowfall) रस्ता बंद असल्याने अडकलेल्या एका रुग्णवाहिकेतील (Ambulance) रुग्णासाठी त्यांनी आपलं हेलिकॉप्टर देऊन टाकलं. यानंतर रोहित नावाच्या रुग्णाला तात्काळ कांगडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी मात्र रस्ते मार्गाने प्रवास केला. 

रुग्णाचा भाऊ प्रितम लाल याने मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांचे आभार मानले आहेत. माझ्या भावाची प्रकृती खराब असल्याचं पाहून त्यांनी तात्काळ त्यांचं हेलिकॉप्टर दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यामुळे माझ्या भावाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करता आलं आणि त्याचा जीव वाचला असं त्याने म्हटलं आहे. 

रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु केले होते. रुग्णालय प्रशासनाने म्हटलं आहे की, "मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून रुग्णाला आमच्याकडे आणण्यात आलं होतं. त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्याचा सर्व खर्च रुग्णालय करणार आहे. रुग्णाच्या श्वासनलिकेला जखम झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत".
हरित हिमाचलसाठी मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सध्या हिमाचल प्रदेशला हरित राज्य करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 2025 पर्यंत हिमाचल देशातील पहिलं हरित राज्य असेल असा दावा त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी काही इलेक्ट्रिक वाहनांना हिरवा झेंडा दाखवला आहे. 

राज्याचा परिवहन विभाग देशातील पहिला ग्रीन विभाग बनवण्यात आला आहे. दोन वर्षात राज्यातील 60 टक्के बसेस इलेक्ट्रिक केली जातील. यासंबंधी ते राज्याचा दौराही करत आहेत. राज्यात प्रदूषण आणि उष्णता वाढत असून आपण सर्वांनी जागरुक होण्याची गरज असल्याचं आवाहन ते सतत करत आहेत.