फक्त 35 पैशाच्या स्टॉकने दिला 5 कोटींचा परतावा; तुम्ही गुंतवले असते तर...

Multibagger stock | गेल्या काही वर्षात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा मिळवून दिला आहे. सध्याचा रशिया - युक्रेन वादाचा काळ वगळता शेअर मार्केटमध्ये चांगली तेजी नोंदवली जात होती. 

Updated: Mar 27, 2022, 07:44 AM IST
फक्त 35 पैशाच्या स्टॉकने दिला 5 कोटींचा परतावा; तुम्ही गुंतवले असते तर... title=

मुंबई : गेल्या काही वर्षात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना बक्कळ परतावा मिळवून दिला आहे. सध्याचा रशिया - युक्रेन वादाचा काळ वगळता शेअर मार्केटमध्ये चांगली तेजी नोंदवली जात होती. दरम्यान, काही अत्यंत कमी किंमतीचे स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. असाच एक स्टॉक म्हणजे Flomic Global Logistics होय. या स्टॉकने गेल्या 7-8 महिन्यात फक्त 7 रुपयांवरून तब्बल 216 रुपयांवर उसळी घेतली आहे.

शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. यामध्ये काही पेनी स्टॉक देखील आहेत असाच एक स्टॉक म्हणजेच Flomic Global Logistics होय. दोन वर्षापूर्वी हा स्टॉक 35 पैसे इतका होता. आता हा स्टॉक 130 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. साधारण दोन वर्षांच्या कालावधीत हा स्टॉक 409 पटींनी वाढला आहे.  दोन वर्षापूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक 5 ते 6 कोटींची झाली असती.

Flomic Global चा ग्राफ

28 मार्च 2019 ला BSE इंडेक्सवर स्टॉकची किंमत 0.35 रुपये होती. आता हा स्टॉक 130 रुपयांच्या आसपास ट्रेड करीत आहे. जुन 2021 मध्ये या शेअरची किंमत 7.62 रुपये होती. ती आज 130 रुपयांपर्यंत पोहचली आहे. या शेअरने ऑक्टोबर 2021 मध्ये 215 रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर शेअरमध्ये मोठे उतार चढ दिसून आले. सध्या रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बाजाराच्या पडझडीचा फटका या स्टॉकलाही बसल्याचे दिसून येत आहे.

वर्ष 2021 मध्ये स्टॉक 1.95 रुपयांच्या तुलनेत सध्या 130 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच कंपनीने आपल्या शेअर धारकांना साधारण 7000 हून अधिक टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. 

8 महिन्यापूर्वी एखाद्या गुंतवणूकदारांने या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आता त्याचे 18.57 लाख झाले असते. एका वर्षापूर्वी गुंतवणूकदारांनी 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर आज 1 कोटीहून अधिक रुपये झाले असते.