Gold Silver Price on 23 April 2023 : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी (Gold Silver Price) किंमतीत घसरण पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर पुन्हा सोने-चांदीच्या दरात किरकोळ वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,880 रुपये आहे. तर चांदी 74,890 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील व्यवहारात चांदीचा दर 74,890 रुपये प्रति किलो होता.
सराफा बाजाराच्या वेबसाइटनुसार, मुंबईत (Mumbai gold rate) 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,880 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम दर 54,890 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,880 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,890 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,880 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,890 रुपये आणि 10 ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याचा दर 59,880 रुपये आहे.
सोन्याने आतापर्यंत 61,000 चा टप्पा गाठला आहे. परंतु भारत सोन्याकडे केवळ गुंतवणूक म्हणून पाहत नाही, स्त्रीधन म्हणून पाहतो. त्यामुळेच सोन्यांने उच्चांकी गाठली तरी ग्राहक अजूनही सोने खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र या वर्षाच्या अखेरीस दर 70,000 प्रति तोळापर्यंत जाईल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वाचा: महाराष्ट्रात 'इतक्या' रुपयांनी महागले पेट्रोल, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील.
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.