२४ तासांत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी...

 जम्मू काश्मीरमध्ये येत्या 24 तासांत दहशतवादी हल्ला होण्याचा अलर्ट जारी करण्यात आलाय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 18, 2017, 10:39 PM IST
 २४ तासांत दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट जारी... title=

जम्मू  :  जम्मू काश्मीरमध्ये येत्या 24 तासांत दहशतवादी हल्ला होण्याचा अलर्ट जारी करण्यात आलाय. 

काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी हा अलर्ट जारी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दुसरीकडे सीमेवर दहशतवाद्यांचा हैदोस सुरुच आहे. 

अनंतनाग इथल्या बिजबेहडा इथं दहशतवादी हल्ला झालाय. सीमेवर तैनात असणा-या भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. 

पुलवामातही दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक स्थानिक नागरिक जखमी झालाय.