दुचाकी चालवताना आता हेल्मेट नसल्यास...

दुचाकी चालवताना जर तुम्ही हेल्मेट घालत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 

PTI | Updated: Jun 27, 2019, 02:16 PM IST
दुचाकी चालवताना आता हेल्मेट नसल्यास... title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : दुचाकी चालवताना जर तुम्ही हेल्मेट घालत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण आता हेल्मेट नसल्यास देशातील वाहन चालकांना ५०० रुपयांऐवजी एक हजार रुपयांचा दंड आणि वाहनाचा विमा नसल्यास दोन हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद नवीन केंद्रीय मंत्रालयाच्या विधेयकात करण्यात आली आहे. 

केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद मोटर वाहन संशोधन विधेयकात करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात वाहतूक नियम अतिशय कडक होणार आहेत. लवकरच या विधेयकाचे रूपांतर कायद्यात होणार असून याची अंमलबजावणी देशभरात केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.