डीजेनं घेतला नवरदेवाचा बळी? वधुला वरमाला घालताच नवरदेव कोसळला

अलिकडच्या काळात Heart Attackनं तरूणांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय, अशीच एक दुर्देवी घटना समो आली आहे, वराने वरमाला घालताच तो स्टेजवरच कोसळला, नातेवाईकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची प्राणज्योत आधीच मालवली होती

Updated: Mar 6, 2023, 06:28 PM IST
डीजेनं घेतला नवरदेवाचा बळी? वधुला वरमाला घालताच नवरदेव कोसळला title=

Heart Attack : लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. लग्नाचा विधी पार पडला होता आणि आता वधू-वर एकमेकांना वरमाला घालण्याचा येऊन ठेपला होता. वधूने वराच्या (Bride and Groom) गळ्यात वरमाला घातली. वरानेही वधूच्या गळ्यात वरमाला घातली आणि काही कळाच्या आतच वर मुलगा स्टेजवरच कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेने लग्नमंडपात एकच खळबळ उडाली. वराच्या नातेवाईकांनी वराला उठवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्देवाने वर मुलाचा जागीच मृत्यू झाला होता (Groom Died from Heart Attack). या घटनेने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली. आनंदाचं वातावरण दु:खात बदलल होतं, डीजेच्या आवाजाची जागा आक्रोशाने घेतली होती. 

काय झालं लग्न मंडपात?
बिहारमधल्या सितामढी (Bihar Sitamadhi) इथली ही दुर्देवी घटना आहे. सुरेंद्र सुखी संसाराची स्वप्न रंगवत बोहल्यावर चढला खरा, मात्र कुणाच्याही ध्यानीमनी नसता लग्नसोहळ्यातच त्याची प्राणज्योत मालवली. सितामढी इथल्या सोनबरसातील इंदरवा गावात लग्नसोहळा सुरू होता. वधू-वरांनी एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातली आणि त्यानंतर अचानक नवरदेव सुरेंद्र बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

सुरेंद्रच्या मृत्यूचं कारण काय?
डीजेमुळे सुरेंद्रचा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार लग्नसोहळ्यात जोरजोरात डीजे सुरू होता. डीजेचा आवाज कमी करा अशी विनंतीही सुरेंद्रनं वारंवार केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि अखेर सुरेंद्रची प्राणज्योत मालवली. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार डीजे, बँडचा मोठा आवाज आणि प्रखर प्रकाश डिप्रेशन वाढवतं. मोठ्या आवाजमुळे अनेकांना घाबरल्यासारखं वाटतं. अनेकजण बेचैन होतात. शरीरातील रक्तप्रवाह कमी होऊन हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. 

रेल्वे परीक्षेची तयारी करत होता सुरेंद्र
तीन भावांमध्ये सुरेंद्र कुमार सर्वात लहान. सुरेंद्रच्या आई-वडिलांचं आधीच निधन झालं होतं. शिक्षणातही सुरेंद्र कुमार हुशार होता. नुकतीच त्याने रेल्वेची परीक्षा पास केली होती. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या लग्नाची बोलणी सुरु होतं. मुलगी पसंत पडल्यानंतर सुरेंद्रने लग्नाला होकार दिला आणि लग्नसमारंभ पार पडणार होता. पण त्या पूर्वीच सुरेंद्र कुमारची प्राणज्योत मालवली.

हे ही वाचा : अपघातात पत्नी-मुलगी गमावली! लोकं फोटो काढत होते, Ambulance चालकाने लुटलं, स्मशानभूमीत पैसे मागितले

हार्टअटॅकच्या घटनांमध्ये वाढ
अलिकडच्या काळात हार्ट अटॅकनं तरूणांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय. अशाच प्रकारे डीजेच्या तालावर नाचताना एका तरूणाला हार्ट अटॅक आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरस झाला होता. तर गुजरातमध्येही क्रिकेटच्या मैदानात एका तरूणाचा अशाच प्रकारे मृत्यू झाला. तर हैदराबादमध्ये टेनिस कोर्टवर एका युवा खेळाडूला मृत्यूनं गाठलं. बदलती जीवनशैली, वाढतं टेन्शन अशी अनेक कारणं हार्ट अटॅकला कारणीभूत ठरू लागलीयेत. तरूणाईसाठी ही निश्चितच चिंतेची बाब म्हणावी लागेल.