पत्नीच्या हत्येत काहीच संबंध नसल्याचं भासवलं, मात्र पोलिसांनी असं शोधून दाखवलं

या हत्येत काहीच संबंध नसल्याचं त्याने भासवण्याचा लाख प्रयत्न केले. मात्र पोलिसांना तो फार वेळ झुलवत ठेवू शकला नाही.   

Updated: Oct 27, 2022, 10:26 PM IST
पत्नीच्या हत्येत काहीच संबंध नसल्याचं भासवलं, मात्र पोलिसांनी असं शोधून दाखवलं title=
(प्रातिनिधीक छायाचित्र)

पटना : मेहुणीसोबत नको ते संबंध सुरु असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत होता. या तरुणाचे फक्त मेहुणीसोबतच नाही, तर महिला पोलिसांसोबतही संबंध होते. आपल्या नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणाची (extra marital affair) माहिती पत्नीला मिळाली.  दोघात तिसरा आला की भांडण व्हायचीच. पती-पत्नीत वाद झाला. पत्नी पतीला सातत्याने हा नाद सोडायला सांगत होती. मात्र नवरा काही ऐकेना. या दररोजच्या वैतागाला आणि वादाला पती कंटाळला. पत्नीच्या कटकटीला कायमचं संपवायचं असं या तरुणाने ठरवलं. त्यानुसार त्याने पत्नीच्या हत्या करण्याचा कट रचला. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात येत पत्नीचा काटाही काढला. आपला या हत्येत काहीच संबंध नसल्याचं त्याने भासवण्याचा लाख प्रयत्न केले. मात्र पोलिसांना तो फार वेळ झुलवत ठेवू शकला नाही. पोलिसांनी सुधीर यादव या तरुणाला मोबाईलच्या सीडीआरच्या (Mobile Cdr) मदतीने जेरबंद केलं.  (he ended her wife police brought the crime of the criminal husband to  through mobile cdr)

नक्की मॅटर काय? 

सुधीर यादव सिवानमध्ये त्याच्या गावी आला. परीक्षेचं कारण सांगितलं. पत्नीला पटन्याला घेऊन गेला. सुधीरची परीक्षा संपली. परीक्षेनंतर दोघेही सिवानला परतत होते. या प्रवासात सुधीरने ठरवल्याप्रमाणे पत्नीला संपवलं. आपल्या पत्नीवर अज्ञात गुन्हेगारांनी गोळ्या झाडून संपवल्याचं सुधीरने पोलिसांना सांगितलं. पोलिसांना एकामागोमाग एक पत्ता सापडत गेला. त्यानुसार पोलिसांनी आधी गुन्हा दाखल केला. मग तपासाला सुरुवात केली.

हा सर्व हत्याकांड सिवानमधील मधेशीलापुरात असलेल्या पुलावर झाला, असा दावा आधी सुधीरने केला. पण जर गावाच्या पुलावर गोळीबार झाला तर मग कुणालाच कसा आवाज गेला नाही, असा प्रश्न पोलिसांना पडला. काही तरी गंडतंय समजल्यावर पोलिसांनी खोलात जावून तपास करण्याचा निर्णय घेतला. सुधीरचीही टाईट चौकशी करायला सुरुवात केली. 

पोलीस अधिकारी मनोज कुमार हे तपास अधिकारी. मनोज कुमार यांनी सुधीरचा आणि त्यांची मृत पत्नी रिया देवी यांचा मोबाईल आपल्याकडे घेतला. पोलिसांनी दोघांच्या मोबाईल नंबरद्वारे सीडीआर काढला. सीडीआरद्वारे तपासाला सुरुवात केली. पोलिसांना सीडीआरनुसार सुधीर आणि त्याची पत्नी रिया एकत्र असल्याचं लक्षात आलं. 

पोलिसांनी सुधीरला चौकशीसाठी कोपऱ्यात घेतलं. त्याची चौकशी केली. कसून चौकशी केल्यानंतर अखेर सुधीरने आपला गुन्हा कबूल केला. मीच पत्नी रियाचा जीव घेतल्याची कबूली त्याने दिली. सुधीरला पोलिसानी अटक केली. हा सर्व प्रकार जानेवारी 2022 मधला आहे.

मेहुणीला लग्नाचं गाजर

पोलिसांच्या चौकशीत एक धक्कादायक बाब समोर आली. मी तुझ्यासोबत लग्न करेन असं आश्वासन सुधीरने त्याच्या मेहुणीला दिलं होतं. इतकंच नाही, तर सुधीरचे महिला पोलिसांसोबतही तसले संबंध होते. सुधीर इतर महिलांशी बोलयचा हे त्याच्या मोबाईल चॅटवरुन समजलं.