HDFC Bank Hikes MCLR : एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) खातेदारांसाठी महत्वाची घोषणा केली आहे. देशातील नामांकीत असलेल्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) सर्व प्रकारच्या लोन्सच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेकडून मिळालेल्या बातमीनुसार, एचडीएफसी बँकेने सर्व लोन टेन्यूअर्ससाठी (Loan tenures) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेटमध्ये (MCLR) 5 ते 10 बेसिस पॉइंट्समध्ये (BPS) वाढ केली आहे.
बँकेने वाढवलेले व्याजदर आजपासून (8 ऑगस्ट) लागू झाले आहेत. नुकतेच, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 0.50 टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ (Repo Rate Hike) केलेली आहे. यापाठोपाठ, एचडीएफसी बँकेने सर्व प्रकारच्या व्याजदरात वाढ केली आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी 5 ऑगस्टला आरबीआयच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीमध्ये 0.50 टक्क्यांनी रेपो रेट वाढवलेला आहे. या घोषणेनंतर वाढलेला रेपो रेट (Repo Rate Hike) 5.40 झाला आहे.
याआधी, आरबीआयने मे महिन्यात 0.50 टक्क्यांनी रेपो रेटमध्ये वाढ केली होती. यानंतर, जून महिन्यात एमपीसी बैठकीत 0.40 रेपो रेटमध्ये वाढ केली होती. अशा प्रकारे मे महिन्यापासून तीन वेळा रेपो रेट वाढल्याने म्हणजेच तो आकडा 1.40 इतका झाला आहे. या वाढीसोबतच, खातेदारांचं होम लोन (Home Loan), कार लोन (Car Loan) आणि पर्सनल लोन (Personal Loan) म्हणजेच बँकेकडून मिळणारे सर्व लोन्स महागतील.