मोफत करा ऑनलाईन व्यवहार, ही बॅंक आकारत नाही शुल्क

एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यापूढे आरटीजीएस, एनईएफटीचे व्यवहार बँकेने विनामूल्य केले आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 24, 2017, 07:00 PM IST
 मोफत करा ऑनलाईन व्यवहार, ही बॅंक आकारत नाही शुल्क  title=

मुंबई : एचडीएफसी बँकेने ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यापूढे आरटीजीएस, एनईएफटीचे व्यवहार बँकेने विनामूल्य केले आहेत.

चेकद्वारे होणारे व्यवहार शुल्क पुढील महिन्यापासून वाढविण्याचा निर्णयही घेतला आहे.

ऑनलाइन व्यवहार मोफत

> बँकेने जारी केलेल्या निवेदनाच्या अनुसार, ग्राहकांना आरटीजीएस आणि एनईएफटीद्वारे ऑनलाइन व्यवहारांसाठी १ नोव्हेंबरपासून शुल्क आकारण्यात येणार नाही.

> बँकेच्या ग्राहकांना याआधी आरटीजीएस वर २५ लाख रु. चा रकमेसाठी प्रत्येकी २ लाख रु. चार्ज केला जायचा.

> त्याच वेळी, एनईएफटीला पाच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे पाठविण्यासाठी ५० रुपये द्यावे लागत असत.

बँकेच्या शाखेद्वारे एनईएफटी किंवा आरटीजीएस व्यवहारांसाठी शुल्क लागू असणार आहे. 

१ नोव्हेंबरपासून

एनईएफटी / आरटीजीएस ऑनलाइन शुल्कांमध्ये केलेले बदल सर्व किरकोळ बचत, पगारदार, परदेशातून कायमची वस्ती करण्यासाठी येणारा किंवा आलेला ग्राहकांसाठी १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू केले असल्याचे बँकेने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.

चेकबुक

 ग्राहकांना वर्षातील २५ पानांचे एकच चेकबुक विनामूल्य मिळेल. २५ पानांचे अतिरिक्त चेकबुकसाठी ७५ रुपये द्यावे लागणार आहेत.