HDFCबँकेने काढलं पत्रक, डेबिट-क्रिडिटने आता करता येणार नाही 'हे' काम

तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC) बँकेचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. HDFC बँकेने आपल्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड्सवरुन बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यास बंदी घातली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 27, 2018, 02:05 PM IST
HDFCबँकेने काढलं पत्रक, डेबिट-क्रिडिटने आता करता येणार नाही 'हे' काम title=

नवी दिल्ली : तुमच्याकडे एचडीएफसी (HDFC) बँकेचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्वाची आहे. HDFC बँकेने आपल्या डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड्सवरुन बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्यास बंदी घातली आहे.

क्रिप्टोकरन्सी व्यतिरिक्त HDFC बँकेने दिलेल्या कार्ड्सच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची वर्चुअल करन्सी खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. ग्राहकांची कुठल्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी सरकारने बिटकॉईनला बेकायदेशीर असल्याचं घोषित केलं आहे.

सर्कुलरमध्ये काय आहे?

सर्कुलरमध्ये बँकेने म्हटलं आहे की, बिटकॉईन, क्रिप्टोकरन्सी आणि वर्च्युअल करन्सी संदर्भात जगभरात विविध तर्क लावण्यात येत आहेत. RBI ने सुद्धा ग्राहकांना या संदर्भात सूचित केलं आहे. आपल्या ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेता HDFC बँकेने क्रेडिट, डेबिट आणि प्रीपेड कार्ड्सवरुन बिटकॉईन, क्रिप्टोकरन्सी आणि वर्च्युअल करन्सी खरेदी करण्यास बंदी घातली आहे.

बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना यासंदर्भात ईमेल पाठवला असून त्याची माहिती दिली आहे.

सिटी बँकेनेही घातलीय बंदी 

HDFC बँकेपूर्वी फेब्रुवारी महिन्यात सिटी बँकेनेही आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवरुन क्रिप्टोकरन्सी खरेदीवर बंदी घातली आहे. यासोबतच बँक ऑफ अमेरिका आणि जेपी मॉर्गन चेज सारख्या ग्लोबल बँकेनेही क्रिप्टोकरन्सी खरेदीवर बंदी घातली आहे. यासोबतच SBIनेही क्रिप्टोकरन्सी पासून ग्राहकांना दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, बँकेने अद्याप आपल्या कार्डवरुन खरेदीवर बंदी घातलेली नाहीये.

सरकारनेही दिलीय माहिती 

सरकारतर्फे अनेकदा सांगण्यात आलं आहे की, क्रिप्टोकरन्सी किंवा वर्च्युअल करन्सी खरेदी करणं किंवा ट्रेंडिंग देशात मान्य नाहीये. जे नागरिक खरेदी करत आहेत त्यांना होणाऱ्या नुकसानाला ते स्वत: जबाबदार असतील. केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेचली यांनीही क्रिप्टोकरन्सी भारतात वैध नसल्याचं यापूर्वी संसदेत म्हटलं आहे.

बँकांच्या नियमांत बदल 

HDFC बँकेने सेव्हिंग अकाऊंटच्या नियमांत बदल केले आहेत. बदललेल्या नियमानुसार, एचडीएफसी क्लासिक कस्टमर्ससाठी महिन्याला कमीत कमी शिल्लक १ लाख रुपये ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच जर तुम्ही एचडीएफसी बँकेचे क्लासिक कस्टमर्स आहेत तर तुमच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये कमीत कमी १ लाख रुपये शिल्लक ठेवणं आवश्यक आहे.