हाथरस अत्याचार : मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक

उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी लवकुश याला पोलिसांनी अटक केली आहे.  

Updated: Oct 3, 2020, 02:21 PM IST
हाथरस अत्याचार : मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक  title=

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी लवकुश याला पोलिसांनी अटक केली आहे. ज्यावेळी पीडिता तिच्या शेतात जखमी अवस्थेत आढळून आली, त्यावेळी आरोपी लवकूश हा शेतात त्याच्या आईसोबत काम करत असल्याचे आरोपीच्या आईचे म्हणणे आहे. 

बहिणीवर सामूहिक बलात्कारच झाला - पीडितेचा भाऊ

लवकुशच्या आईने 'झी मीडिया'शी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्हाला न्याय मिळाला आहे. माझी मुलगी गेली. मला आता काही नको, न्याय हवा, असे तिने मीडियाशी बोलताना सांगितले.

तर हाथरस प्रकरणातील दुसऱ्या आरोपीच्या आईनेही आपली बाजू मांडली आहे. आपला मुलगा सकाळी ७ वाजता डेअरीवर कामाला गेला आणि दुपारीच परत आल्याचे तिने सांगितले. पीडित कुटुंब वारंवार आपले जबाब बदलत असल्याचा आरोपही तिने केला आहे.

आरोपीच्या आईने तिचा मुलगा निर्दोष असल्याचे म्हटले आहे. त्या दिवशी आपण मुलासोबत शेजारच्या शेतात गवत कापत होतो. पीडित मुलीची आई देखील गवत कापत होती. मात्र शेतात पडलेल्या मुलीकडे तिने दुर्लक्ष केल्याचे आरोपीच्या आईने म्हटले आहे. आमचे म्हणणे कोणीच ऐकून घेत नसल्याची तक्रार आरोपीच्या आईने केली आहे.

6\