Crime News : मोठ्या भावाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर विधवा वहिनीसोबत लग्न करणाऱ्या भावाने पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाला सात वर्षे झाल्यानंतर आरोपी पतीने केलेल्या खूनामुळे सर्वांना धक्का बसला आहे. (Sonipat Wife Murder )
नेमकं काय घडलं?
हरियाणामधील (Haryana) सोनीपत (Sonipat) इथल्या गांधीनगरमध्ये आरोपी विजय पत्नी सोनियासोबत चार मुलांसह भाड्याच्या घरात राहत होता. विजय रात्री उशिरा घरी येतो त्यावेळी त्याचं आणि सोनियाचं जोरदार भांडण होतं. दोघांमध्ये भांडण चालू असताना अचानक गोळीचा मोठा आवाज येतो. विजयने सोनियाच्या छातीमध्ये गोळी मारलेली होती.
छातीमध्ये गोळी मारून झाला फरार-
विजयने मारलेल्या गोळीचा आवाज होतो त्या आवाजाने शेजारचे गोळा होतात. त्यावेळी सोनिया रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसते, याबाबत ते घर मालकांना माहिती देतात. पोलिसांना घटनेची माहिती होताच ते घटनास्थळी दाखल होतात. मात्र विजय गोळी मारून पिस्तुलासह फरार झालेला असतो.
भावाच्या मृत्यूनंतर सोनियासोबत विजयने केलं होतं लग्न
आरोपी विजयचा मोठा भाऊ विजयसोबत सोनियाचं लग्न झालं होतं. दोघांना तीन मुलंही झाली होतीत मात्र दुर्देवाने त्याचा अपघातामध्ये मृत्यु होतो. त्यावेळी विजय आपल्या विधवा झालेल्या वहिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतो. सर्वांना त्याच्या या निर्णयाचं कौतुक वाटतं.
दरम्यान, विजय आणि सोनियाला एक मुलगीही होते. ती मुलगी आता 4 वर्षांची आहे, मात्र विजयने सोनियाला का मारलं?, याचं कारण समोर आलं नसून पुढील प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.