नवी दिल्ली : हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल वीज यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते अंबाला कॅंटच्या सिव्हील रुग्णालयामध्ये दाखल आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान हरियाणा मंत्रिमंडळातील महत्वाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या अनिल विज यांनी कोव्हाक्सिन परीक्षणाच्या स्वयंसेवकाची जबाबदारी खाद्यावर घेत १५ दिवसांपूर्वी कोरोना लस घेतली. तरी देखील ते कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.
I have been tested Corona positive. I am admitted in Civil Hospital Ambala Cantt. All those who have come in close contact to me are advised to get themselves tested for corona.
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) December 5, 2020
वीज यांनी कोरोनाची लागण झाल्याची बातमी ट्विटरच्या माध्यमातून दिली. 'मला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे मी अंबाला कॅंटच्या सिव्हील रुग्णालयात उपचार घेत आहे.' असं त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.
शिवाय गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःची कोरोना चाचणी करावी असा सल्ला देखील त्यांनी दिला.