'ही' एक सवय बाळगाल तर जग बदलू शकाल! आनंद महिंद्रा यांचा कानमंत्र

Good habit: 'जर लोकांनी या माणसाच्या उदाहरणाचे अनुसरण केले तर ते जगात सर्वात शक्तिशाली बदल करु शकतात. 'ऐकणे आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकणे' ही  आपल्यासाठी शिकण्याची सर्वात कठीण सवय आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 4, 2023, 10:57 AM IST
'ही' एक सवय बाळगाल तर जग बदलू शकाल! आनंद महिंद्रा यांचा कानमंत्र title=

Good habit: आपल्या नेहमी जगातील शक्तीशाली व्यक्तींची उदाहरणे दिली जातात. पण या व्यक्ती अशा कोणत्या गुणांमुळे तिथपर्यंत पोहोचल्या हे आपल्याला कदाचितच माहिती असते. अशा व्यक्तींना काही चांगल्या सवयी असतात. त्याचे पालन करणे खूपच कठीण असते. पण एकदा का तुम्हाला याची सवय लागली तर तुम्हाला शक्तीशाली बदलकर्ता होण्यापासून कोणी रोखून शकत नाही. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील हे पटलं आहे. त्यांनी एक ट्विट करत यासंदर्भातील व्हिडीओ शेअर केला आहे. ही सवय खूप सोपी आहे आणि प्रत्येकाला अंगिकारता येणारी आहे. अशी ही नेमकी कोणती सवय आहे, याबद्दल जाणून घेऊया. 

रोज एक चांगली सवय अंगीकारली तर आपण यशस्वी होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे जात असतो असे म्हटले जाते.  उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या 10.5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्ससह त्यांना शिकलेली सवय शेअर केली. आठ वेळा ग्रॅमी अवॉर्डचे निर्माते रिक रुबिन यांचा एका मिनिटाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केलाय. सर्वात कठीण सवय म्हणजे पूर्वग्रह न ठेवता ऐकणे. या सवयीने तुम्ही जगात चांगला बदल घडवू शकता, असे यात म्हटले आहे. 

'जर लोकांनी या माणसाच्या उदाहरणाचे अनुसरण केले तर ते जगात सर्वात शक्तिशाली बदल करु शकतात. 'ऐकणे आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकणे' ही  आपल्यासाठी शिकण्याची सर्वात कठीण सवय आहे.

संक्षिप्त व्हिडिओत अमेरिकन रेकॉर्ड निर्माता रुबिन म्हणतात, एखाद्याने कोणताही पूर्वग्रह न ठेवता, मनात काही न ठेवता संभाषण सुरू केले पाहिजे. याची सवय लावून घेतली पाहिजे. पुढे मिळणाऱ्या सर्वोत्तम प्रतिसाद किंवा मताचा विचार न करता ऐकले पाहिजे. एखाद्याने फक्त जे समोर येते ते ऐकण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे., पूर्वीच्या समजुतींनी प्रभावित न होता ऐकले पाहिजे. त्यानंतर तात्काळ प्रतिक्रियावादी बनणे टाळले पाहिजे. शक्य तितके तटस्थ राहावे, असे यात म्हटले आहे. 

कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती, पदवीधरांना मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

माझे ध्येय मत बनवणे नाही, तर ते समजून घेणे आहे, असे रुबिनला व्हिडिओमध्ये असे म्हणताना ऐकू येत आहे. जर एखाद्याने त्याला उत्तेजित करणारे शब्द ऐकले तर त्यांना प्रतिसाद न देणे हीच खरी ताकद आहे, असे ते सांगतात. 

तात्काळ प्रतिक्रिया देण्याआधी समोरच्या व्यक्तीला असे का वाटते हे समजून घेण्यासाठी प्रश्न विचारु शकता. हे ऐकण्याच्या दिशेने काळजीपूर्वक उचललेले लहान पाऊल ठरु शकते, असे यात सांगण्यात आले आहे.

आनंद महिंद्रा यांना रुबिनचा हा सल्ला पटला असून त्यांनी इतरांनाही हा कानमंत्र दिला आहे. त्यानंतर त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला. यानंतर काही तासाभरातच या व्हिडीओला 80K पेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगात विविध पदांची भरती, पुण्यात नोकरीसह 2 लाखांपर्यंत मिळेल पगार