खुलासा! सिनेमे हिट करण्यासाठी राम रहीम हनीप्रीतसोबत करायचा हे काम!

बलात्कारप्रकरणी शिक्षा झालेला राम रहीमबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गुरमीतचा ड्रायव्हर आणि साक्षीदार खट्टा सिंह याने राम रहीमची पोलखोल केली आहे. खट्टा सिंहने राम रहीमच्या सिनेमांबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

Updated: Sep 5, 2017, 04:18 PM IST
खुलासा! सिनेमे हिट करण्यासाठी राम रहीम हनीप्रीतसोबत करायचा हे काम! title=

नवी दिल्ली : बलात्कारप्रकरणी शिक्षा झालेल्या राम रहीमबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. गुरमीतचा ड्रायव्हर आणि साक्षीदार खट्टा सिंह याने राम रहीमची पोलखोल केली आहे. खट्टा सिंहने राम रहीमच्या सिनेमांबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

त्याने दिलेल्या माहितीनुसार, राम रहीम त्याच्या सिनेमाच्या माध्यमातून अनेक कोटींचा काळापैसा व्हाईट करत होता. जेव्हाही बाबाचा एखादा सिनेमा रिलीज होत होता, तेव्हा तो थिएटर मालकाकडून सर्व तिकीटे स्वत:च विकत घेत होता. 

असे राम रहीम दाखवत होता की, त्याच्या सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळतोय आणि सिनेमाची कमाई जोरदार होतीये. राम रहीम ही तिकीटे काळ्या पैशातून खरेदी करत होता. राम रहीम हा केवळ काळा पैसा पांढरा करण्यासाठी सिनेमे करत होता. त्याला सिनेमात तसा काहीच इंटरेस्ट नव्हता तरीही तो करायचा. यात निर्मातेही त्याला साथ देत होते. निर्माते राम रहीमच्या सिनेमाची कमाई वाढवून सांगत होते. 

राम रहीमचा ‘मॅसेंजर ऑफ गॉड’ हा सिनेमा २०१५ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने केवळ १६.८९ कोटींची कमाई केली होती. मात्र निर्मात्यांनी ही कमाई १३० कोटींची झाल्याचे सांगितले होते. तेच ‘मॅसेंजर ऑफ गॉड २’ या सिनेमाची कमाई निर्मात्यांनी ४५० कोटी सांगितली होती. मात्र प्रत्यक्षात ती कमाई केवळ १७ कोटींची होती. या सर्व झोलमध्ये राम रहीमला सर्वात जास्त साथ मिळायची ती हनीप्रीतची. राम रहीमचा काळा पैसा पांढरा करण्याची सर्व जबाबदारी हनीप्रीतवर असायची.