केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर हा हत्ती प्रसन्न, एकदा हा व्हिडीओ पाहाच

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हत्ती का झाला प्रसन्न? पाहा व्हिडीओ

Updated: Jul 12, 2021, 10:22 PM IST
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर हा हत्ती प्रसन्न, एकदा हा व्हिडीओ पाहाच title=

अहमदाबाद: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चात आहे. हा व्हिडीओ खास आहे कारण चक्क हत्तीच शाहांवर प्रसन्न झाला आहे. हा व्हिडीओ गुजरातच्या जगन्नाथ मंदिरातील आहे. या व्हिडीओमुळे हत्ती आणि शाह दोघंही सोशल मीडियावर चर्चेत आले आणि त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

जगन्नाथ मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हत्तीचं दर्शन घेतलं. यावेळी तिथल्या हत्तीला त्यांनी ऊस खाऊ घातला. हत्तीने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आशीर्वाद दिला. हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

अमित शाह यांनी हत्तीनं प्रसन्न होऊन सोंडेनं आशीर्वाद दिल्याची चर्चा रंगली आहे. गुजरातच्या जगन्नाथ मंदिरातील हा व्हिडीओ व्हायरल होताच सर्वांचं लक्ष या व्हिडीओनं वेधून घेतलं आहे.