नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत विजय मिळवत भाजपने इतिहास घडवला आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांत भाजपने बहूमत मिळवत आपली सत्ता स्थापन केली आहे.
१८२ जागांच्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण दोन टप्प्यांत मतदान झालं होतं. तर, ६८ जागांच्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी ११ नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं.
गुजरातमध्ये भाजपने विजयाचा षटकार लगावला आहे. यापूर्वी भाजपने सलग पाच वेळा गुजरात विधानसभा निवडणुकीत बहूमत मिळवलं होतं. त्यानंतर आता सहाव्यांदा बहूमत मिळवत सत्ता स्थापन करण्यात येणार आहे.
भाजपने १९९५ साली पहिल्यांदा गुजरात विधानसभेत विजय मिळवला. त्यानंतर आपली विजयाची घौडदौड कायम राखली आहे. सहावी टर्म पूर्ण केल्यास भाजप सलग २७ वर्ष सत्ता स्थापन करेल. सलग २७ २७ वर्ष सत्ता एका पक्षाच्या हातात येण्याची इतिहासातील पहिली वेळ ठरणार आहे.
स्वातंत्र्यानंतर भारतातील विविध राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली होती. तर, काही राज्यांत सत्तेत सहभागी होते. काँग्रेसकडे सर्वाधिक १८ राज्यांपैकी काही राज्यांत एकहाती सत्ता घेतली होती किंवा सत्तेत सहभागी होते. मात्र, भाजपने काँग्रेसचा हा रेकॉर्ड मोडला आहे.भाजपाने गुजरात आणि हिमाचलची निवडणूक जिंकून देशातील १९ राज्य ताब्यात घेतली आहेत. या १९ राज्यांपैकी काही राज्यांत भाजपची एकहाती सत्ता आहे तर काही ठिकाणी सत्तेत सहभागी आहेत.
निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर विविध चॅनल्स आणि सर्व्हे एजन्सीने केलेल्या एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोल्सच्या आकड्यांनुसार, भाजपचीच सत्ता येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. एक्झिट पोलने ठरवलेला अंदाज खरा ठरल्याचं पहायला मिळत आहे.