अहमदाबाद : गुजरातमधील (Gujarat) वडोदरा ( Vadodara) जिल्ह्यात दोन ट्रकमध्ये (Truck accident) जोरदार आज पहाटे धडक झाली. दुर्घटनेत ११ जण ठार झाले. तर १७ जण जखमी झाले आहेत. वाघोडिया क्रॉसिंग हायवेवर ही दुर्घटना घडली. या भीषण अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जखमींवर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. तर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
Gujarat: Nine people died, 17 injured in a collision between two trucks, at Waghodia Crossing Highway in Vadodara earlier this morning. The injured admitted to a hospital where they are undergoing treatment. https://t.co/z5HkSPfIo8 pic.twitter.com/kEdPcAkp98
— ANI (@ANI) November 18, 2020
दरम्यान, दुसऱ्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील कोठारिया गावाजवळ आज सकाळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.