नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीच्या मतमोजनीत काँग्रेस भाजपमध्ये काट्याची टक्कर पहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता असतान बनारसमध्ये वेगळे चित्र पहायला मिळत आहे. भाजपला विजय मिळावा म्हणून बनारसमध्ये विजयासाठी यज्ञ करण्यात आला. एग्झीट पोलमध्ये तर, भाजप विजयी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसारित केलेल्या फोटोनुसार भाजप समर्थक हवन करताना दिसत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार 182 जागांपैकी भाजप 103 तर कॉंग्रेस 75 जागांवर आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे.
#UttarPradesh Supporters perform 'Havan' in #Varanasi as counting of votes continues for Gujarat and Himachal Pradesh assembly elections pic.twitter.com/V5yOEgOo71
— ANI UP (@ANINewsUP) December 18, 2017
कडेकोट पोलीस बंदोबस्तात 33 जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ही मतमोजणी एकूण 37 केंद्रांवर सुरू आहे. गुजरातमध्ये झालेल्या 182 जागांसाठी 68.41 टक्के मतदान झाले होते. उत्तर गुजरातमध्ये 32 जागा आहेत. दक्षिण गुजरातमध्ये 35, सौराष्ट्र 54 आणि मध्य गुजरातमध्ये 91 जागा आहेत.