2019 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील: आनंदीबेन पटेल

आम्हाला मान्य आहे की, सौराष्ट्र मध्ये आम्ही कमी पडलो - आनंदीबेन

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Dec 18, 2017, 12:08 PM IST
2019 मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील: आनंदीबेन पटेल title=

नवी दिल्ली : गुजरातमध्ये काही ठिकाणी आम्हाला फटका बसला. पण, अपवाद वगळता मतदारांनी भाजपला चांगली साथ दिली. काही ठिकाणी आलेल्या अपयशाचा आम्ही नक्की विचार करू. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला हा बदल दिसेल, असे मत व्यक्त करतानाच 2019मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील असा विश्वास गुरजारतच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी व्यक्त केले आहे.

आनंदीबेन यांनी म्हटले आहे की, आम्हाला मान्य आहे की, सौराष्ट्र मध्ये आम्ही कमी पडलो. पण, उत्तर गुजरात, दक्षिण गुजरात आणि मध्य गुजरातमध्ये आम्ही चांगली कामगिरी केली. येत्या काळात आम्ही अधिक चांगली कामगिरी करू. कारण, पंतप्रधा मोदी हे गुजरातचे आहेत. त्यामुळे आमची जबाबदारी आहे की, 2019मध्ये मोदींना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनविण्यासाठी भाजपला अधिक मजबूत करणे, असेही आनंदीबेन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ताज्या वृत्तानुसार भाजप सध्या 105 जागांवर आघाडीवर आहे. तर, कॉंग्रेस 74 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 3 जागांवर अगाडीवर आहेत. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी प्रचंड पिछाडीवर आहेत. जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर हेही जोरदार आघाडीवर आहेत. त्यामुळे गुजरातमधले राजकीय चित्र प्रचंड बदलताना दिसत आहे. गुजरातमध्ये भाजपचा पराभव झाला किंवा अल्पमतात सत्ता आली तरी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासाठी तो प्रचंड मोठा धक्का असणार आहे. दरम्यान, निवडणुकीचे कल क्षणाक्षणाला बदलत आहेत अद्याप कोणतेही चित्र स्पष्ट झाले नाही.

कडेकोट पोलीस बंदोबस्तात 33 जिल्ह्यांमध्ये मतमोजणीला सुरूवात झाली आहे. ही मतमोजणी एकूण 37 केंद्रांवर सुरू आहे. गुजरातमध्ये झालेल्या 182 जागांसाठी 68.41 टक्के मतदान झाले होते. उत्तर गुजरातमध्ये 32 जागा आहेत. दक्षिण गुजरातमध्ये 35, सौराष्ट्र 54 आणि मध्य गुजरातमध्ये 91 जागा आहेत.