Gujarat Election : 'हॅलो MLA...'; मोठ्या विजयानंतर रविंद्र जडेजाची पत्नीसाठी भावूक पोस्ट

MLA Rivaba Jadeja : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत एकूण 156 जागा जिंकल्या आहेत. जामनगर उत्तरमधून निवडणूक लढवणाऱ्या रिवाबा जडेजा या भाजपच्या सर्व उमेदवारांमध्ये चर्चेत होत्या.

Updated: Dec 9, 2022, 05:20 PM IST
Gujarat Election : 'हॅलो MLA...'; मोठ्या विजयानंतर रविंद्र जडेजाची पत्नीसाठी भावूक पोस्ट title=

MLA Rivaba Jadeja : गुजरात निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. कॉंग्रेस आणि आपला नमवत भाजपने मोठ्या फरकारने विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय खेचून आणला आहे. या निवडणुकीत जामनगर उत्तर हा मतदारसंघात सर्वात जास्त चर्चेत होता. या जागेवरुन भारतीय क्रिकेटपटू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याची पत्नी रिबावा जडेजा या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या होती. 

53 हजार मतांनी केला आप उमेदवाराचा पराभव

रिवाबा यांनी आपच्या उमेदवाराचा पराभव केलाय. महत्त्वाची बाब म्हणजे रविंद्र जडेजाची बहिण त्याच मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत होती. रिवाबा यांनी आम आदमी पार्टीचे करशनभाई यांचा 53 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रिवाबा यांना 88,835 मते मिळाली, तर करशनभाई यांना 35265 मते मिळाली.

तू खरचं पात्र आहेस - रविंद्र जडेजा

या विजयानंतर रविंद्र जडेजाने पत्नी रिवाबा यांच्यासाठी खास ट्विट केले आहे. "हॅलो MLA,तू खरचं यासाठी पात्र आहे. जामनगरच्या जनतेचा विजय झाला आहे. मी सर्व लोकांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आशापुरा मातेकडे प्रार्थना करतो. जामनगरची कामे खूप चांगल्या पद्धतीन होतील. जय माताजी," असे जडेजाने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

रिवाबा यांना मिळणार मंत्रीपद?

गुजरात निवडणुकीत रिबावा या केंद्रस्थानी होत्या. रिवाबा यांनी आपल्या प्रचारामध्ये अनेकवेळा पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे आता रिवाबा यांनी मंत्रीमंडळात स्थान मिळणार का अशी चर्चा सुरु झालीय. गेल्या अनेक दिवसांपासून रिवाबा या सामाजिक कार्यात पुढे असल्याचे दिसत आहेत. तरुण असल्याने त्यांना संधीही मिळण्याची शक्यता आहे.