J P Nadda : BJP अध्यक्ष जे पी नड्डा यांची सुट्टी कोण मंजूर करतं?

जेव्हा तुम्हाला सुट्टी हवी असते तेव्हा कोणाशी बोलावं लागतं? असा सवाल जेपी नड्डा (J P nadda) यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. 

Updated: Dec 9, 2022, 05:17 PM IST
J P Nadda :  BJP अध्यक्ष जे पी नड्डा यांची सुट्टी कोण मंजूर करतं? title=
(फोटो सौजन्य - ANI)

मुंबई : भाजपचा (Bjp) गुजरातमध्ये 150 पेक्षा अधिक जागांवर दणदणीत विजय (Gujrat Assembaly Election Result 2022) झाला. यासह भाजप पुन्हा एकदा गुजरातमध्ये सत्ता कायम राखण्यास यशस्वी ठरली. गुजरात निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून (Pm Narendra Modi) सर्व दिग्गज नेत्यांनी कंबर कसली आहे. आता विजय झाल्याने भाजपच्या सर्वच नेत्यांनी निश्वास घेतला आहे. साहजिकपणे विजयानंतर आता बरेच नेतेमंडळी विश्रांतीच्या मूडमध्ये आहेत. मात्र नेतेमंडळींना सुट्टी हवी असते तेव्हा त्याबाबत कोणाकडे परवानगी मागतात, याबाबत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (J P Nadda) यांनी माहिती दिली आहे. जेव्हा तुम्हाला सुट्टी हवी असते तेव्हा कोणाशी बोलावं लागतं? असा सवाल जेपी नड्डा यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर नड्डा यांनी उत्तर दिलंय. (bjp president j p nadda told who will approved his leave gujrat election result 2022)

नड्डा काय म्हणाले? 

"सुट्टी आजारी असल्यावर किंवा फार महत्त्वाचं काम असेल तरच घ्यायची असते. तसेच सुट्टीमध्येही पक्षाचं काय काम करता येईल का, असा विचार सुरु असतो. सुट्टीसाठी संसदीय मंडळासह चर्चा करावी लागते", असं नड्डा यांनी सांगितलं. ते एका हिंदी वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मुलाखतीत नड्डा यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. 

"सुट्टी म्हणजे तब्येत स्थिर नसणं किंवा अन्य इतर काही समस्या, अन्यथा आम्ही कामातच असतो. कामातच आम्ही आनंद घेतो. जगण्याचा हाच मंत्र आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून याचाच आदर्श घेतला आहे. ते स्वत: अशाच प्रकारे काम करतात", असंही नड्डा यांनी नमूद केलं.