Guddu Muslim Arrested : Atique Ashraf हत्याप्रकरणाचं नाशिक कनेक्शन, गुड्डू पोलिसांच्या जाळ्यात

 Umesh Pal Murder Case :  माफिया डॉन अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) या हत्याकांडानंतर यूपी पोलिसांची झोप उडाली असताना.  उमेश पाल हत्या प्रकरणात यूपी एसटीएफला (#BreakingNews ) मोठ यश मिळालं आहे. 

Updated: Apr 16, 2023, 09:36 PM IST
Guddu Muslim Arrested : Atique Ashraf हत्याप्रकरणाचं नाशिक कनेक्शन, गुड्डू पोलिसांच्या जाळ्यात  title=
guddu muslim arrested nasik maharashtra umesh pal murder case

Guddu Muslim Arrested : माफिया अतिक अहमद हत्याकांडानंतर उत्तर प्रदेश एसटीएफला मोठं यश मिळाले आहे.  माफिया डॉन अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) हत्याकांड प्रकरणाचं (Atique Ashraf Murder Case) कनेक्शन नाशिकशी जोडलं गेलं आहे. उमेश पाल हत्या प्रकरणातील फरार बॉम्बर गुड्डू मुस्लिम गजाआड झाला आहे. महाराष्ट्रातील नाशिकमधून (Nasik) अटक करण्यात आली आहे. उमेश पाल यांची हत्या केल्यानंतर मुस्लिम फरार होता. यूपी पोलिसांनी त्याच्यावर 5 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून यूपी पोलीस आणि एसटीएफने गुड्डू मुस्लिमला (Guddu Muslim) पकडण्यासाठी मोहीम अधिक तीव्र केली होती. 

दरम्यान, तो महाराष्ट्रात लपल्याची खबर मिळाली.   त्यानंतर रविवारी एसटीएफच्या पथकाने त्याला नाशिकमधून अटक केली. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात गुड्डू मुस्लिम लपल्याची माहिती यूपी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस यांच्या मोर्चा नाशिककडे वळला. त्यानंतर नाशिक क्राईम ब्रँच आणि यूपी एसटीएफन यांच्या संयुक्त कारवाईतून या मोहीमेला यश देण्यात आलं. 

माफिया डॉन अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ (Ashraf Ahmed) यांची हत्या झाली. त्यानंतर अशरफने गुड्डू मुस्लिमचं नाव घेतलं होतं. पण त्याला नेमकं काय म्हणायचं होतं ते त्याच्यासोबत दफन झालं. 

नाशिक पोलिसांकडून स्पष्टीकरण 

नाशिक पोलिसांकडून या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेलकम हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका वेटरला दिल्ली पोलिसांच्या पथकाने चौकशीसाठी उचलं होतं. शस्त्रास्त्राशी संबंधित एका प्रकरणात त्याची चौकशी केली नंतर त्याला सोडून देण्यात आलं. 

या चौकशीदरम्यान त्या वेटरने सांगितलं की त्याचा मोबाईलवर मिस्ड कॉल आला होता. वेटरने त्या नंबर फोन केल्यावर त्याला चुकून नंबर डायल केल्याचं बोलण्यात आलं. यानंतर पोलिसांनी वेटरला सोडून दिलं. शिवाय नाशिक पोलिसांनी हे सांगितलं की यूपी एसटीएफच्या कोणत्याही टीमने आतापर्यंत त्यांच्याशी संपर्क केला नाही. 

कोण आहे गुड्डू मुस्लिम ?

उमेश पाल गोळीबारानंतर सोशल मीडियावर गुड्डू मुस्लिमच्या नावाची सर्वत्र चर्चा आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकीच्या मागे पांढरा शर्ट घातलेला व्यक्ती हा गुड्डू मुस्लिम असल्याचं बोलं जातं आहे. या व्यक्तीने बॅगेतून बॉम्ब काढला आणि फेकल्या. त्यासोबत उमेश पाल यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ज्यात उमेश यांचा मृत्यू झाला. दरम्यान गुड्डू मुस्लिमने दोन दशकांपूर्वीच गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला आहे.