Bride Broke Wedding: सप्तपदी सुरू असताना नवरदेवाला चक्कर आली. (Wedding) कोणाला काही कळायच्या आतच तो मंडवातच खाली कोसळला. आपल्या होणाऱ्या नवऱ्याला त्या अवस्थेत पाहताच नवरीला (Bride) धक्का बसला. नवरदेवाची (Groom) तब्येत बिघडली असतानाच वधूने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. या घटनेने एकच गोंधळ उडाला. (Husband And Wife News)
उत्तर प्रदेशमधील कानपूर देहातमध्ये ही घटना घडली आहे. धर्मपूर येथे राहणाऱ्या युवकाचे चपरघाटा गावात राहणाऱ्या मुलीसोबत लग्न ठरले होते. 24 जून रोजी शनिवारी लग्न होणार होते. लग्नासाठी नवरदेव वरात घेऊन मुलीच्या घरी आले. त्यांचा स्वागत समारंभ, सत्कार हे सगळे यथासांग पार पडले. त्यांनतर वरमालाच्या विधीसाठी नवरदेव व मुलगी स्टेजवर पोहोचले. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. मुलीचे वडिलही लेकीचं लग्न पाहताना खुश दिसत होते. तर नातेवाईकही पंगतीचा आस्वाद घेत होते.
नवरी-नवरीला सप्तपदीसाठी मांडवात बोलवण्यात आले. दोघेही फेरे घेत असताना अचानक नवरदेवाला चक्कर आली आणि तो खाली मांडवातच कोसळला. मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला शुद्धीवर आणण्यास यश आले. मात्र, नवरदेव शुद्धीत येताच नवरीने लग्नाला नकार दिला. सकाळपर्यंत सर्वजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत राहिले. मात्र तिने कोणाचच ऐकलं नाही. ती लग्न न करण्याच्या तिच्या हट्टावर ठाम राहिली. नवरीच्या हट्टापायी वरात परत गेली.
या घटनेनंतर वर व वधू पक्षाच्या कुटुंबातील लोकांच्या साक्षीने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना या बाबतीत कोणत्याही प्रकारे मध्यस्थी करण्यात आलं नाही. फिट आल्याने नवरा चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याचा दावा करण्यात येत आहे. वधुच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी मुलीची खूप समजूत खालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही.
नवऱ्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा चक्कर येऊन पडल्याने नवरीने लग्न मोडले. वधुने घेतलेल्या या निर्णयाने आम्ही खूप निराश झालो आहोत. अशाप्रकारे लग्न मोडायला नको होतं. आम्ही नवरीला न घेऊन जाता वरात परत घेऊन जात आहोत. तर, गावात लग्न मोडल्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे. लोक यावरुन अनेक तर्क-वितर्क लढवत आहेत.