Newly wed couple : लग्नानंतर मुलगा आणि मुलगी दोघांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विशेषतः मुलगी दुसऱ्या घरात जाणार असल्याने जास्त तिच्यावर प्रेशर असतं. अशात लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्यासोबत घडली अत्यंत भयानक घटना. तिच्यासोबत जे घडलं ते कदाचित ती आयुष्यात कधीच विसरणार नाही. कदाचित ती लग्नानंतरची पहिली रात्र आजही तीच्या डोळ्यासमोर उभी राहत असेल स्वप्न म्हणून. आजही त्या आठवणी तिला प्रचंड वेदना देत असतील. खरंतर हनीमूनची रात्र नवरा आणि बायकोसाठी खूप स्पेशल असते. या आठवणी नवरा बायको आयुष्यभर साठवून ठेवतात. मात्र तिच्यासोबत त्या रात्री जे झालं ते अत्यंत भयावह, धक्कादायक आणि अत्यंत वेदनादायक होतं.
लग्नानंतरची हनीमूनची पहिली रात्र नवरा आणि बायकोसाठी अत्यंत खास असते. नवदांपत्याच्या पुढील संपूर्ण आयुष्याची ही सुरुवात असते. लग्नाच्या दिवशी सर्व व्यवस्थित पार पडलं. वेळेवर मिरवणूक पोहोचल्यानंतर वधूच्या घरच्यांनी वराचं स्वागत केलं. सर्व विधी व्यवस्थित पार पडले. तिचा आणि त्याचा विवाह उत्तम रित्या संपन्न झाला. मुलीच्या आई बाबांनी मुलीला मोठ्या हिमतीने निरोप दिला. मात्र, तिच्यासोबत जे होणार होतं त्याची ना तिला, ना तिच्या कुटुंबियांना, ना त्याच्या कुटुंबियांना कल्पना होती. कारण ती रात्र तिच्यासाठी अत्यंत अप्रिय आणि भयंकर ठरणार होती.
ती नव्या घरी पोहोचली. आसपासची मंडळी नववधूला भेटायला आली होती. छान गप्पा टप्पा टप्पा झाल्या. अखेर रात्र झाली. तिच्या आणि त्याच्यासाठी हनीमूनची तयारी झालेली. बेडरूम सजवलं गेलेलं. स्वतः तिच्या सासरच्यांनी तिला हनिमूनसाठी खोलीतही पाठवलं. त्यानंतर तिच्यासोबत तो भयंकर प्रकार घडला.
दुसऱ्या दिवशी तिने थेट आपल्या घरच्यांना फोन करून तात्काळ बोलावून घेतलं. तिचे आई वडील आणि तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं. तिने त्या रात्रीची भीषण कहाणी पोलिसांना सांगितली. पहिल्याच रात्री नवऱ्याने जे केलेलं ते ऐकून पोलिसही अवाक झालेत. पोलिसांनीही नवऱ्याला पकडून थेट ठाण्यात आणलं.
सासरच्यांनी तिला हनिमूनसाठी खोलीत पाठवल्यानंतर नवरा खोलीत नव्हता. आता नवरा नाही म्हंटल्यावर ती जरा रिलॅक्स झाली असेल. अशात तिचा कधी डोळा लागला हे तिचं तिलाच समजलं नाही. बऱ्याच वेळाने तिचा नवरा खोलीत आला. त्याने तिला जागं करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र कदाचित थकव्यामुळे तिला गाढ झोप लागलेली. आपली बायको उठत नाही म्हणून म्हणून त्याची तळपायाची आग मस्तकात गेलेली. पहिल्याच रात्री त्याने बेल्ट काढला आणि नवविवाहित बायकोला सपासप मारहाण करण्यास सुरुवात केली. ती रात्र तिच्यासाठी अतिशय धक्कादायक अशीच होती. त्या रात्री सासरच्यांनी मुलाला आवरलं. दुसऱ्या दिवशी मात्र तिने तिच्या आई वडिलांना फोन केला. बोलावून घेतलं आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं. मात्र पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर त्यांच्यात समझोता झाल्याचं आता समजतंय.
groom beats bride on their honeymoon night bride reached police station