मुंबई : सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त लग्नाच्या व्हिडिओंची चर्चा आहे. इंटरनेटवर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामुळे प्रेरणा मिळते तर काही व्हिडिओंमुळे सर्वत्र भावनिक वातावरण दिसतं. पण आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तर नवरदेव चक्क सासूला म्हणजे नवरीच्या आईला वरमाळा घालताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तरप सर्वत्र फक्त या व्हिडिओची चर्चा आहे.
व्हिडिओमध्ये नवरदेव आणि नवरी वरमाळाच्या विधीसाठी उभे आहेत. नवरीच्या बाजूला तिची आई आहे. तेव्हा नशेत बुडालेल्या नवरदेवाला नवरी आणि तिच्या आईमधील अंतर कळत नाही. त्यामुळे नशेत तो नवरीच्या आईला म्हणजे सासूला वरमाळा घालण्यासाठी जातो. तेव्हा सासू नशेत असलेल्या जावयाचे हात पकडते.
अशा परिस्थितीत नवरीच्या चेहऱ्यावरील भाव सर्वांना चक्क करणारे आहेत. यानंतर नवरदेव नवरीला वरमाळा घालण्यासाठी जातो आणि खाली पडतो. तेव्हा नवरदेवाला सावरण्यासाठी काही लोक पुढे येतात. हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाख 85 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.