मुंबई : पुढच्या 24 तासांत सरकारी योजनांबाबत सरकार मोठा निर्णय घेणार आहे. हा निर्णय व्याजदराबाबत घेतला जाणार आहे. सरकार प्रत्येक तीन महिन्यात काही स्कीमच्या व्याज दराचं संशोधन करतात. 30 सप्टेंबरला म्हणजे आज सरकार स्किमच्या व्याजदराबाबत मोठा निर्णय घेणार आहे. यामध्ये पोस्ट ऑफिस, पीपीएफ आणि जीपीएफ यांच्या व्याड दरांवर संसोधन केलं जाणार आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्या पैशांवर पडणार आहे.
30 जून 2021 मध्ये सरकारने स्मॉल सेविंग स्कीमवर व्याज दरांवर परिणाम होणार आहे. सरकारने या अगोदरच्या व्याज दरांना कायम ठेवलं आहे. त्याच्यात कोणताच बदल केलेला नाही. मात्र आता कोरोनाला पाहता त्याचे व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाही संपत आहे. त्यामुळे आता व्याज दर वाढण्याची शक्यता आहे.
जर आपण आकडेवारी पाहिली तर पोस्ट ऑफिसच्या अनेक बचतीवरील व्याज दर सलग 5 तिमाहीत समान ठेवले गेले आहेत. सार्वजनिक भविष्य निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), सुकन्या समृद्धी योजना (SSY) यासारख्या योजना पोस्टाने चालवल्या जातात आणि यावरील व्याज दर जुन्या स्तरावर ठेवण्यात आले आहेत.
याचा अर्थ असा आहे की पीपीएफ आणि एसएसवाय सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना अजूनही समान व्याज दर मिळत आहेत जे त्यांना मागील तिमाहीत मिळत होते. 30 सप्टेंबरनंतर नवीन तिमाही सुरू होत आहे आणि त्यापूर्वी गुंतवणूकदारांना अपेक्षा आहे की कमाईमध्ये काही वाढ होऊ शकते.
सध्याच्या दरानुसार, पीपीएफवर 7.10 टक्के, एनएससीवर 6.8% आणि पोस्ट ऑफिस मासिक योजनेवर 6.6% व्याज दिले जात आहे. आकडेवारीनुसार, पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4% व्याज आहे आणि त्याचे व्याज एका वर्षात वाढले आहे. एक वर्ष मुदतीच्या ठेवीवर 5.5 टक्के व्याज दर असतो आणि प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ केला जातो. 2 वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याज 5.5% आहे आणि हे तिमाही देखील उपलब्ध आहे. 3 वर्षांच्या मुदत ठेवीसाठीही हेच आहे.
5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.7% व्याज मिळते आणि प्रत्येक तिमाहीत पैसे वाढतात. 5 वर्षांच्या रिकरिंग डिपॉझिटमध्ये 5.8% व्याज मिळते आणि पैसे तिमाहीने वाढवले जातात. 5 वर्षांची ज्येष्ठ नागरिक बचत योजना 7.4% व्याज मिळवते आणि पैसे तिमाही चक्रवाढ होतात. 5 वर्षांच्या मासिक उत्पन्न खात्यावर 6.6% व्याज आहे आणि त्याचे व्याज दरमहा जमा होते. 5 वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर व्याज 6.8% आहे आणि त्याचे व्याज दरवर्षी वाढते. PPF वर व्याज 7.1% आहे आणि ते दरवर्षी खात्यात जोडले जाते. 124 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या किसान विकास पत्रावर 6.9% व्याज असते आणि दरवर्षी चक्रवाढ होते. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज 7.6% आहे आणि ते दरवर्षी चक्रवाढ होते.