सरकारच्या 'या' प्लॅनमुळे स्वस्त होईल पेट्रोल-डिझेल!

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकजण हैराण आहेत. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 16, 2018, 01:46 PM IST
सरकारच्या 'या' प्लॅनमुळे स्वस्त होईल पेट्रोल-डिझेल! title=
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकजण हैराण आहेत. दिल्लीत पेट्रोलची किंमत ७१ रूपये झाली असून त्याने गेल्या ४० महिन्यांपासूनच रेकोर्ड बेक्र केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. देशात काही ठिकाणी डिझेलची किंमत ६७ रुपयांहुन अधिक आहे. तर पेट्रोलची किंमत ८० रुपयांच्या आसपास पोहचली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला या वाढत्या किंमतीतून दिलासा देण्यासाठी सरकार नवीन प्लॅनिंग करत आहे.

पेट्रोलची किंमत ७९.१५ रुपये प्रती लिटर

मंगळवारी मुंबईत पेट्रोलची किंमत ७९.१५ रुपये प्रती लिटर झाली आहे. तर दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत ७१.२७ रूपये प्रति लीटर आहे. तर दिल्लीत डिझेलची किंमत ६१.८८ रुपये प्रति लीटर वर पोहचली आहे. मुंबईत एक लीटर डिझेलसाठी ६५.९० रुपये भरावे लागतात. त्यामुळे वाढत्या किंमतीतून सामान्यांना दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम पदार्थांवरील जीएसटीच्या अंतर्गत आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

जीएसटी काऊंसिलिंगची बैठक

पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की १८ जानेवारीला होणाऱ्या जीएसटी काऊंसिलिंगच्या बैठकीत या मुद्द्यावर विचार करण्यात येईल. त्यामुळे किंमती कमी होतील. सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याचा पर्यायही खुला ठेवला आहे. मात्र यावर जीएसटी काऊंसिलिंग बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल.

५% जीएसटीचा प्रस्ताव

मंत्रालयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्राकृतिक गॅसवर ५% जीएसटी लावण्याचा प्रस्ताव आहे. अधिकतर राज्य या प्रस्तावाशी सहमत आहे. त्याचबरोबर सरकार एअर टरबाईन फ्यूल (एटीएफ) देखील जीएसटीच्या पक्षात आणण्याचा विचार करत आहे. 

जीएसटी अतिशय उत्तम पर्याय

पंजाब, हरिणाया, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, युपी, उत्तराखंड आणि चंदीगड या राज्यात समान सेस टॅक्स लागू शकतो. या राज्यात पेट्रोलच्या किंमती समान आहेत. पेट्रोलियम मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, वाढत्या उत्पादन शुल्कामुळे पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लावणे हा अतिशय उत्तम पर्याय आहे. पेट्रोलियम पदार्थांना जीएसटी लागल्यानंतर त्याच्या किंमती कमी होतील.