नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आले. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीपीएफवरील व्याजदर ७.६ टक्के इतका होता. त्यात आता वाढ करण्यात आले. त्यामुळे व्याजदर ८ टक्के इतका झाला आहे.
केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी आणि अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ करण्यात आलाय. गेल्या दोन तिमाहीत हे व्याजदर जैसे थे होते. जानेवारी ते मार्च २०१८ या तिमाहीसाठी व्याजदरात कपात करण्यात आली होती. ती पुढे कायम ठेवण्यात आली होती. आता या वाढ करण्यात आल्याने जीपीएफ धारकांना मोठा दिलासा मिळालाय.
केंद्रीय वित्त विभागाने आज एक परिपत्रक काढून व्याजदरवाढीची घोषणा केली. २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या तिमाही अखेरपर्यंत जीपीएफ आणि अन्य योजनांसाठी ८ टक्के व्याज देण्यात येईल, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. हे नवीन व्याजदर केंद्र सरकारी कर्मचारी, रेल्वे तसेच सुरक्षा दलांच्या भविष्य निर्वाह निधीवरही लागू असणार आहेत.