खुशखबर! राज्यात सोनं, चांदी होणार स्वस्त? महाविकास आघाडीने नियुक्त केली समिती

सोन्यावरील मुद्रांक शुल्क कमी करण्याबाबत राज्य सरकारने समिती नियुक्ती केली आहे. त्यामुळे राज्यातील सोने तसेच चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

Updated: Jan 6, 2022, 06:21 PM IST
खुशखबर! राज्यात सोनं, चांदी होणार स्वस्त? महाविकास आघाडीने नियुक्त केली समिती title=

मुंबई : सोन्यावरील मुद्रांक शुल्क कमी करण्याबाबत राज्य सरकारने समिती नियुक्ती केली आहे. त्यामुळे राज्यातील सोने तसेच चांदी स्वस्त होण्याची शक्यता आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मुद्रांक शुल्क कमी करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. 

मुद्रांक शुल्क कमी केल्यास राज्याच्या महसुलावर किती परिणाम होईल याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली आहे. 

समितीला एका महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल. जर सोन्यावरील मुद्रांक शुल्क कमी झाला तर, राज्यातील सोने चांदीचे दर कमी होऊ शकतात.