मुंबई : शेअर बाजारातील 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या स्टॉक एस्कॉर्ट्स लिमिटेडमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेला हा स्टॉक multibagger ठरला आहे. राकेश झुनझुनवाला यांनी डिसेंबर 2021 च्या तिमाहीत एस्कॉर्ट्स लिमिटेडमध्ये 0.5 टक्के नवीन शेअर्स खरेदी केले आहेत. झुनझुनवाला हे बाजारातील अनुभवी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत.
BSE वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या डिसेंबर 2021 (Q3FY22) तिमाहीसाठी Escorts Limited च्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांनी कंपनीतील होल्डिंग 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.22 टक्के (6400000 शेअर्स) केले आहे. झुनझुनवाला यांच्याकडे एस्कॉर्ट्स लिमिटेडचा सप्टेंबर 2021 मध्ये 4.75 टक्के हिस्सा होता. 6 जानेवारी रोजी गुंतवणूकीचे मूल्य 1,202.2 कोटी रुपये होते.
एस्कॉर्ट्स लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 56 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 1200.60 रुपयांवरून 1875.55 रुपयांपर्यंत वाढली.
एका वर्षात, स्टॉकमध्ये 45 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.