मुंबई : NPS Scheme : जर तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये (NPS) गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला लवकरच उत्तम सुविधा मिळणार आहेत. पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PFRDA) जाहीर केले आहे की, लवकरच या योजनेच्या (NPS) सदस्यांना आर्थिक वर्षात चार वेळा गुंतवणूक पॅटर्न बदलण्याची परवानगी दिली जाईल. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत वर्षातून दोनदाच गुंतवणुकीचा पॅटर्न बदलण्याची सुविधा आहे.
PFRDAचे अध्यक्ष सुप्रतीम बंदोपाध्याय म्हणाले, सध्या ग्राहक वर्षातून दोनदा गुंतवणूक पर्याय बदलू शकतात. लवकरच आम्ही ही मर्यादा चार पट वाढवणार आहोत. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक या प्लॅनमध्ये बदल करण्याची मागणी करत होते. त्यानंतर PFRDAने हा निर्णय घेतला आहे.
PFRDAचे अध्यक्ष म्हणाले की, पीएफआरडीएला पेन्शन फंड तयार करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकीचे उत्पादन बनवायचे आहे आणि म्यूच्युअल फंड योजना म्हणून गृहीत धरले जाऊ नये. लोक कधीकधी म्यूच्युअल फंड म्हणून समजतात. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही ते वापरु शकता. त्याचा विचारपूर्वक वापर करा, आम्ही ते वाढवणार आहोत.
योजनेअंतर्गत, सदस्य त्यांची गुंतवणूक सरकारी सिक्युरिटीज, कर्ज साधने, मालमत्ता-बॅक्ड आणि ट्रस्ट-स्ट्रक्चर्ड गुंतवणूक, अल्पकालीन कर्ज गुंतवणूक आणि इक्विटी आणि संबंधित तुम्ही गुंतवणूक करु शकतात. तथापि, ग्राहकांच्या वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे नियम आहेत. उदाहरणार्थ, सरकारी क्षेत्रातील कर्मचारी इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक करु शकत नाहीत तर कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचार्यांना 75 टक्के पर्यंत मालमत्ता इक्विटीमध्ये वाटप करण्याची परवानगी आहे.