Budget 2022 मध्ये रेल्वे प्रवाशांना मिळणार खूशखबर ! रेल्वे करु शकते या मोठ्या घोषणा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण काही तासातच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात ते काय घोषणा करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे.

Updated: Jan 31, 2022, 08:46 PM IST
Budget 2022 मध्ये रेल्वे प्रवाशांना मिळणार खूशखबर ! रेल्वे करु शकते या मोठ्या घोषणा title=

Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) काही तासानंतर संसदेत अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करणार आहेत. कोरोना महामारी दरम्यान सादर होत असलेल्या या बजेटमध्ये सर्वसामान्य व्यक्तीपासून उद्योगपतींना देखील आशा आहेत. यंदा बजेटमध्ये नोकरदार वर्गाचा इनकम टॅक्‍स स्‍लॅब बदलण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांना देखील सरकारकडून मोठी आस लागून आहे.

प्रत्येक क्षेत्रातून अर्थमंत्र्यांकडे वेगवेगळ्या मागण्या आल्या. यातच 1 फेब्रवारीला सादर होत असलेल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी देखील काही महत्त्वाच्या घोषणा होऊ शकतात. सरकार रेल्वेवरील (Indian Railways) खर्च वाढवू शकते. ज्यामुळे रेल्वे सेवांमध्ये आणखी सुधारणा होऊ शकते.

10 नव्या रेल्वे सुरु होण्याची शक्यता (10 New Trains)

सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारकडून रेल्वे बजेट (Railway Budget 2022) मध्ये 15 टक्के वाढ केली जाऊ शकते. प्रवाशांच्या सुविधेसाठी सरकारकडून 10 नव्या रेल्वे गाड्या सुरु  करण्याची घोषणा होऊ शकेत.  या शिवाय सरकार मेट्रोच्या योजनेसाठी काम करत आहे. ज्यामध्ये एल्युमिनियमच्या कमी वजनाच्या रेल्वे चालवण्याची तयार सरकारकडून सुरु आहे.

100 टक्के विद्युतीकरण 

कमी वजनाच्या रेल्वे चालवण्यासाठी सरकार काही खाजगी कंपन्यांसोबत काम करु शकते. सरकार रेल्वेच्या पायभूत सुविधांवर अधिक भर देण्याचा विचार करत आहे. 2030 पर्यंत रेल्वेचं 100 टक्के विद्युतीकरण करण्याचं सरकारलं लक्ष्य आहे. भारतीय रेल्वे 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी हायड्रोजन आणि बायोफ्यूल ट्रेन प्रोजेक्टची घोषणा केली जावू शकते.

रेल्वे बजेट ( Rail Budget 2022 ) मध्ये डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (Dedicated Freight Corridor) लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी घोषणा केली जावू शकते. रेल्वेचा ईस्‍ट कोस्‍ट कॉरिडोर खडगपूर ते विजयवाडा पर्यंत बनणार आहे. ईस्‍ट-वेस्‍ट कॉरिडोर भुसावळ ते खडगपूर होत डानकुनी पर्यंत असेल. नॉर्थ-साउथ कॉरिडोर इटारसी ते विजयवाडा पर्यंत असणार आहे.