खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, या वेळेत दिसणार उल्कावर्षाव

१७ नोव्हेंबर २०३१ रोजी महाउल्कावर्षाव दिसण्याची शक्यता

Updated: Nov 17, 2018, 08:53 AM IST
खगोलप्रेमींसाठी आनंदाची बातमी, या वेळेत दिसणार उल्कावर्षाव title=

मुंबई : खगोलप्रेमींना शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे उल्कावर्षाव पाहण्याची संधी मिळणार आहे. सिंह राशीतील मघा नक्षत्रातून लिओनिड उल्का वर्षाव होईल. हा उल्कावर्षाव शनिवारी उत्तररात्री साधारण अडीच वाजल्यापासून ईशान्येकडील आकाशात सिंह राशीतील मघा नक्षत्रात पाहता येईल. तासाला १२ ते १५ उल्का पडताना दिसू शकतील. शनिवारी रात्री पश्चिम आकाशात शनी आणि मंगळ यांचे दर्शन होईल.

महाउल्कावर्षाव

'चंद्र उत्तररात्री २ वाजून १३ मिनिटांनी मावळेल. त्यामुळे उल्कादर्शनात चंद्रप्रकाशाचा अडथळा येणार नाही.

सोबत दुर्बीण असल्यास त्यातून शनीची वलये, चांद्रविवरे आणि देवयानी दीर्घिका यांचेही दर्शन घेता येईल', अशी माहिती खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलीय.

२० मे, २०३१ रोजी टेम्पल टटल धूमकेतू सूर्यापाशी येणार आहे.

त्यामुळे १७ नोव्हेंबर २०३१ रोजी महाउल्कावर्षाव दिसण्याची शक्यता सोमण यांनी वर्तवलीय.