Gold-Silver Price Today: नोव्हेंबर महिन्यात दिवाळीची लगबग सुरू होतेय. दिवाळीत सोनं खरेदी करण्याची प्रथा आहे. लक्ष्मीपूजन किंवा धनत्रयोदशीला हमखास सोनं खरेदी करतात. यंदा ग्राहकांना स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. मंगळवारी पुन्हा एकदा सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. कमोडिटी बाजारात सोनं आणि चांदीचे भाव घसरले आहेत. (Today Gold Silver Rate On 31 October 2023)
इस्राइल आणि हमासच्या युद्धामुळं सोन्याचे भावात मोठी उसळी पाहायला मिळाली होती. कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याच्या भावाने 2010 डॉलरचा भाव पार केला होता. मात्र, आता सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 135 रुपयांनी घसरून 61145 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही 420 रुपयांची घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीची किंमत 72335 रुपये प्रति किलोवर ट्रे़ड करत आहे.
मंगळवारी 22 कॅरेट सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नसून 24 कॅरेट सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाल्याचे पाहायला मिळते. 31 ऑक्टोबरपर्यंत देशभरातील इतर शहरात 10 ग्रॅम सोन्याच्या किरकोळ किंमतीत तफावत असल्याचे दिसून आले. २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत अंदाजे ६२,३९० रुपये, तर २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ५७,१९० रुपये आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी सोनं आणि चांदीचा भाव उतरल्याचे पाहायला मिळाले. कॉमेक्सवर सोनं जागतिक बाजारात 0.11 टक्के म्हणजेच 2.30 डॉलरने घसरुन 2003.30 डॉलरवर ट्रेड करत होता. त्याचबरोबर चांदीही जागतिक बाजारात 043 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. चांदी 23.30 डॉलरवर ट्रेड करत होती.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव 2000 डॉलर पार केल्यानंतर घसरला आहे. कॉमेक्सवर सोन्याचा दर 2000 च्या जवळ आला आहे. कालपर्यंत सोन्याचा दर 2010 डॉलरच्या वर गेला होता. चांदीची किंमत देखील थोड्या घसरणीसह $ 23.25 प्रति ऑसवर व्यवहार करत आहे. US FED च्या बैठकीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे.