या आठवड्यात सोन्याच्या भावाने दाखवला असा रंग, 3 दिवसापासून सोन्याचा तोच सिलसिला सुरु

या संपूर्ण आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर, सोने सुमारे 600 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

Updated: Aug 6, 2021, 02:16 PM IST
या आठवड्यात सोन्याच्या भावाने दाखवला असा रंग, 3 दिवसापासून सोन्याचा तोच सिलसिला सुरु title=

मुंबई : MCX वरील सोन्याचं मार्केट गुरुवारी 300 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह बंद झाले. जरी गुरुवारी दिवसभर सोन्याचे भाव एका रेंजमध्ये ट्रे़ड करत राहिले, परंतु अचानक शेवटच्या तासांमध्ये विक्री झाली. त्याच सोन्याचा भाव पडला. आजही, सोन्याचे भाव मार्केट उघडल्यापासून सुस्तावलेले दिसत आहेत आणि केवळ एका श्रेणीत व्यापार करत आहेत. आता सोन्याचा भाव 47 हजार 500 च्या आसपास टिकला आहे. त्यामुळे जर या संपूर्ण आठवड्याबद्दल बोलायचे झाले तर, सोने सुमारे 600 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

या आठवड्यात सोन्याचे भाव  (02-06 ऑगस्ट)

दिवस              किंमत (MCX)
सोमवार           48086/10 ग्रॅम
मंगळवार         47864/10 ग्रॅम
बुधवार            47892/10 ग्रॅम
गुरुवार            47603/10 ग्रॅम
शुक्रवार           47570/10 ग्रॅम (ट्रेडिंग सुरू)

गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव (26-30 जुलै)

दिवस              किंमत (MCX)
सोमवार            47461/10 ग्रॅम
मंगळवार          47573/10 ग्रॅम
बुधवार             47577/10 ग्रॅम
गुरुवार             48281/10 ग्रॅम
शुक्रवार            48001/10 ग्रॅम

सर्वोच्च पातळीवरून सोने सुमारे 8700 रुपयांनी स्वस्त

गेल्या वर्षी, कोरोना संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये, MCXवरील 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56 हजार 191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. आता MCXवर सोने ऑक्टोबरमध्ये 47 हजार 500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते सुमारे 8 हजार 700 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

MCX चांदी: चांदीचा भाव गुरुवारी सुमारे 600 रुपयांनी घसरला, ज्यामुळे चांदी 67 हजार 000 रुपयांच्या खाली बंद झाली. आजही चांदी किंचित घसरणीसह व्यापार करत आहे आणि किंमती अजूनही 67 हजार रुपयांच्या खाली आहेत. या संपूर्ण आठवड्याबद्दल बोलायचे झाले, तर चांदी सुमारे 1 हजार रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.

या आठवड्यातील चांदीचे भाव

दिवस              किंमत (MCX)
सोमवार            67889/किलो
मंगळवार          67914/किलो
बुधवार             67500/किलो
गुरुवार             66998/किलो
शुक्रवार            66900/किलो (ट्रेडिंग चालू)

गेल्या आठवड्यात चांदीचा भाव

दिवस              किंमत (MCX)
सोमवार           67121/किलो
मंगळवार         66056/किलो
बुधवार            66390/किलो
गुरुवार            68200/किलो
शुक्रवार           67847/किलो

चांदी 13 हजार रुपयांनी स्वस्त

चांदीची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी 79 हजार 980 रुपये प्रति किलो आहे. त्यानुसार, चांदी देखील उच्चतम पातळीपासून सुमारे 12 हजार 500 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

सराफा बाजारात सोने आणि चांदीचे भाव

सराफा बाजारात आज सोने स्वस्त झाले, सोने आज 47 हजार 731 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडले आहे. जे काल 48 हजार 6 रुपये होते. सराफा बाजारात आज चांदी देखील स्वस्त झाली आहे. चांदी आज 67 हजार 572 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. तर गुरुवारी हा दर 67 हजार 596 रुपये होता.