Gold Price Today : सोने-चांदी खरेदीदारांना धक्का; 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार इतके रुपये, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Gold Silver Price Today :  गेल्या आठवड्यात सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मात्र काही दिवसांपासून सोन्यात किंचित घट नोंदवण्यात आली होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या किमती बदलतात. आज मात्र सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 5, 2023, 10:02 AM IST
Gold Price Today : सोने-चांदी खरेदीदारांना धक्का; 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार इतके रुपये, किंमत ऐकून व्हाल थक्क!  title=
Gold silver prices on April 5

Gold Silver Price on 5th April 2023 : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. 4 एप्रिल 2023 ला सोन्याच्या दरात वाढ झाली होती तर त्याच वेळी चांदीच्या दरात घसरण होती. मात्र आज सोन्याला महागाईची इंगळी डसली आहे. सोन्याने गगन भरारी घेतली. गेल्या महिन्यात सोन्याचा भाव 58, 880 रुपये प्रति तोळा होता. हा रेकॉर्ड काल संध्याकाळी मोडला. आता सोन्याच्या भावाने नवीन ओळख दिली. सोन्याच्या या नवीन भावाने सर्वांनाच घाम फुटला आहे. या आठवड्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये 55,300 असून पूर्वीच्या व्यवहारात मौल्यवान धातूची किंमत प्रति 10 ग्रॅम रु. 54,700 वर बंद झाल. तर गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार चांदी 74,600 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. पूर्वीच्या व्यवहारात चांदीची किंमत 74,000 रुपये प्रति किलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती संपूर्ण भारतात बदलतात. 

वाचा: घराच्या बाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर तपासा...  

गेल्या महिन्यात सोने 58,880 रुपये तोळा आणि चांदी 74,700 रुपये प्रति किलो दराने विकली जात होती. गेल्या आठवड्यात सोन्याने अचानक जोर भरला. एका महिन्याच्या विश्रांतीनंतर सोन्याने भल्याभल्यांना डोके खाजवायला लावले. मुंबईत आज (5 एप्रिल 2023) 22 कॅरेट सोन्याचा भाव 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,330 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,300 एसेल आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,330 एसेल आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 55,300 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 60,330 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 55,330 रुपये आणि 10 ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याचा दर 60,360 रुपये आहे. प्रति 10 ग्रॅम चांदीचा आजचा दर 746 रुपये आहे.    

24 कॅरेट सोन्याचा दर

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,480 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. याशिवाय हैदराबादमध्ये 60,3230 रुपये आहे. 

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध

24 कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी आहे. शुद्ध सोने किंवा 24 कॅरेट सोने हे 99.9 टक्के शुद्धतेचे लक्षण आहे आणि त्यात इतर कोणतेही धातू मिसळलेले नाहीत. सोन्याची नाणी आणि बार तयार करण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. सोन्यासाठी इतर भिन्न शुद्धता देखील आहेत आणि त्या 24 कॅरेटच्या तुलनेत मोजल्या जातात. 

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.