Gold Price Today : सोनच्या दरात 9 हजार 300 रूपयांची घसरण; तर चांदी देखील स्वस्त

जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर 

Updated: Sep 9, 2021, 01:07 PM IST
Gold Price Today : सोनच्या दरात 9 हजार 300 रूपयांची घसरण; तर चांदी देखील स्वस्त title=

मुंबई : गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात वाढललेले सोन्याचे दर अस्थित असले तरी दर जवळपास 9 हजार रूपयांनी कमी झाले आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्यासह चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाली आहे. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करतात. त्यात दर कमी झाल्याने ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. एमसीएक्सनुसार सध्या सोन्याच्या दरात 180 रूपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. 

या आठवड्यातील सोन्याचे दर 
दिवस                       सोन्याचे दर 

सोमवार                 47 हजार 425 रूपये 10 ग्रॅम 
मंगळवार               46 हजार 939 रूपये 10 ग्रॅम 
बुधवार                  47 हजार 38 रूपये 10 ग्रॅम 
गुरुवार                 46 हजार 860 रूपये 10 ग्रॅम 

गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर
दिवस                     सोन्याचे दर 

सोमवार                 47 हजार 164 रूपये 10 ग्रॅम 
मंगलवार                47 हजार 120 रूपये 10 ग्रॅम 
बुधवार                   47 हजार 68  रूपये10 ग्रॅम 
गुरुवार                   46 हजार 991 रूपये 10 ग्रॅम 
शुक्रवार                 47 हजार 524   10 ग्रॅम  

चांदीच्या दराद देखील मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत चांदिचे दर  900 रूपयांनी कमी झाले आहेत. सध्या चांदी 64 हजार रूपयांवर ट्रेड करत आहे. 

या आठवजड्यातील चांदीचे दर

दिवस                     चांदीचे दर 
सोमवार                 65 हजार 292 रूपये 
मंगळवार               64 हजार 621 हजार
बुधवार                  64 हजार 183 हजार
गुरुवार                  63 हजार 700 हजार

एक मिस्ड कॉल देवून जाणून घ्या सोन्याचे दर 
आता सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला सोनाऱ्याच्या दुकानात जाण्याती गरज नाही. आता तुम्हाला घर बसल्या सोन्याचे दर जाणून घेता येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. मेसेजच्या माध्यमातून सोन्याचे दर तुम्हाला कळतील.