Gold- Silver च्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ! जाणून घ्या आजचे नवे दर

मागील आठवड्यात सुरवातीपासून सोने चांदीत अस्थिरता दिसून आली मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या (Gold-silver) दरात स्थिरता दिसून येत आहे. गणेशोत्सवामुळे सर्वांचा सोने चांदी खरेदी करण्याकडे कल दिसत असल्याने सोने चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 5, 2022, 10:03 AM IST
Gold- Silver च्या दरात 'इतक्या' रुपयांनी वाढ! जाणून घ्या आजचे नवे दर   title=

Gold Silver Price: मागील आठवड्यात सुरवातीपासून सोने चांदीत अस्थिरता दिसून आली मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या (Gold-silver) दरात स्थिरता दिसून येत आहे. गणेशोत्सवामुळे सर्वांचा सोने चांदी खरेदी करण्याकडे कल दिसत असल्याने सोने चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

आज 22 कॅरेटसाठी सोन्याचा दर 46,650 रुपये तर 24 कॅरेट साठी 50,890 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 525 रुपये आहे. 

24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.

चेन्नई - 51,510 रुपये

दिल्ली - 51,050 रुपये

हैदराबाद - 50,890 रुपये

कोलकत्ता -50,730 रुपये

लखनऊ - 51,050 रुपये

मुंबई - 50,890 रुपये

नागपूर - 50,920 रुपये

पूणे - 50,920 रुप

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

वाचा : पहिल्या सामन्यात Hero, दुसऱ्या सामन्यात Zero; 'या' पाच जणांमुळे भारताचा पराभव 

हॉलमार्क (Hallmark)

सोने खरेदी करताना हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.