मुंबई : भारतीयांना सणासुदीच्या दिवसांमध्ये सोने खरेदीचे वेध लागतात. पितृपक्ष संपताच सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येणार आहे. भारतीय बाजाराचा सणासुदीच्या दिवसांचा अंदाज असल्याने सोन्याच्या दरांमध्ये आता वाढ होत आहे. ऑक्टोबर सुरू झाल्या झाल्या सोन्याच्या दरांनी उसळी घेतली आहे.
सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये सलग काही दिवस घसरण नोंदवली गेली होती. अमेरिकी फेडचा बॉंडबाबत निर्णय, डॉलर मजबूत होणे इत्यादी कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्या होत्या. परंतु आता पुन्हा सोन्याच्या किंमतीमध्ये तेजीचे संकेत मिळत आहे.
1 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरांमध्ये 900 ते 1000 रुपये प्रति तोळे इतकी वाढ झाली होती. आज देखील मल्टीकमोडिटी एक्स्चेंज (MCX )वर सोन्याचा दर 46 हजार 425 प्रति तोळेच्या आसपास ट्रेड करीत होता. तर चांदी 60 हजार 300 रुपये प्रति किलोवर ट्रेड करीत होते.
मुंबईतील सोन्याचे दर
22 कॅरेट 45,490 प्रति तोळे
24 कॅरेट 46 490 प्रति तोळे
मुंबईतील चांदीचे दर 60,500 रुपये किलो इतके आहेत.
या आठवड्यात पितृपक्षाची समाप्ती होणार आहे. घटस्थापना, दसरा, दिवाळी आदी सणांच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीची मागणी वाढणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सुवर्णझळाळी वाढण्याचीही शक्यता आहे.