मुंबई : एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना, सोन्याच्या दरांमध्ये मात्र काही दिवसांपासून घसरण नोंदवली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव स्थिर आहेत. परंतु भारतीय बाजारांमध्ये काही प्रमाणात घसरण दिसून येत आहे.
मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गेल्या काही दिवसांपासून सोन्यात काही प्रमाणात घसरण नोंदवण्यात येत आहे. दसरा सणानंतर सोन्याच्या दरांमध्ये घसरण होणे अपेक्षित होते. आता पुन्हा दिवाळी, लक्ष्मीपुजनच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांमध्ये वाढ होऊ शकते.
विविध शहरातील सोन्याचे दर
मुंबई 47,460 रुपये प्रतितोळे
चैन्नई 48,920 रुपये प्रतितोळे
कोलकाता 49,650 रुपये प्रतितोळे
नवी दिल्ली 50,950 रुपये प्रतितोळे
सोन्याच्या दरांध्ये ऑगस्ट 2020 मध्ये मोठी वाढ झाली होती. मागील वर्षी सोन्याचे दर 56 हजारांपर्यंत गेले होते. त्याप्रमाणात सोने सध्या 8 हजार रुपये प्रति तोळ्याच्या आसपास स्वस्त मिळत आहे.
चलन तरलता वाढल्याने वाढतात भाव
देशाची मध्यवर्ती बँक नेहमीच सोने राखीव ठेवत असते. बाजारात जेव्हा जेव्हा चलनाची तरलता वाढते तेव्हा तेव्हा सोन्याचा सप्लाय कमी होतो अन् सोन्याचे भाव वाढतात.
व्याज दरांचा परिणाम
आर्थिक प्रॉडक्ट्स आणि सर्विसेससाठी व्याज दरांचा थेट संबध सोन्याच्या मागणीशी असतो. व्याजदरे घसरल्यास ग्राहक कॅशच्या बदल्यात सोने विकतात. ज्यामुळे सोन्याचा सप्लाय वाढतो आणि सोन्याचे दर कमी होतात.
सणांच्या दिवसांत दरांमध्ये वाढ
आपल्या देशात सणासुदीच्या दिवसांमध्ये सोने खरेदी शुभ मानले जाते. अशावेळी सोन्याचा सप्लाय वाढला तरीदेखील त्याच्या किंमती वाढत असतात.