कमी जोखीम तुफान परतावा! HDFC Fund च्या नवीन स्किममध्ये गुंतवणूकीचा सल्ला; जाणून घ्या सविस्तर

 जर तुम्हालाही कमी जोखिमेमध्ये चांगला परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करायची असेल HDFC Nifty Next 50 Index Fund लॉंच होणार आहे.

Updated: Oct 22, 2021, 10:54 AM IST
कमी जोखीम तुफान परतावा! HDFC Fund च्या नवीन स्किममध्ये गुंतवणूकीचा सल्ला; जाणून घ्या सविस्तर title=

मुंबई : जर तुम्हालाही कमी जोखिमेमध्ये चांगला परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक करायची असेल HDFC Nifty Next 50 Index Fund लॉंच होणार आहे. ही NFO स्किम 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हा फंड NIFTY Next 50 Index  फंडमध्ये टॉप 50 कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणार आहे.

एचडीएफसी म्युच्युअल फंडनुसार ही स्किम त्या गुंतवणूकदारांसाठी उत्तम आहे. ज्यांच्या गुंतवणूकीचे लक्ष कमीत कमी 3 वर्षे असेल. तसेच ज्यांना इक्विटीमध्ये दीर्घ अवधीसाठी गुंतवणूक करून सामान्य योजनांपेक्षा अधिक परतावा हवा आहे. 

इंडेक्स म्युच्युअल फंड
इंडेक्स म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंडची अशी कॅटेगरी आहे. ज्याला पॅशिव फंड्स म्हटले जाते. हा फंड त्याच सेक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करतो. ज्या इंडेक्सला तो ट्रॅक करतो. तसेच हे फंड पॅसिवली मॅनेज केले जातात. यामध्ये कमीत कमी 95 टक्के रक्कम सिक्युरिटिजमध्ये गुंतवली जाते.

इंडेक्स फंडची आणखी एक विेशेष बाब म्हणजे, यामध्ये एक्सपेंस रेश्यो कमी असतो. या योजनेत कमी रक्कम देखील गुंतवता येते. इंडेक्स फंड तुलनेने कमी जोखिम असलेला पर्याय मानला जातो. 

NFO म्हणजे काय
जर कोणतीही एसेट मॅनेजमेंट कंपनी कोणताही फंड लॉंच करते, तेव्हा तो काही दिवसांसाठी खुला असतो. फंड पोर्टफोलिओसाठी शेअर खरेदी करणे हे लक्ष असते. NFO एक प्रकारे नवीन फंड सुरू करण्यासाठी पैसा उभारला जातो.